Kalyan Former Corporator beaten by woman : कल्याणमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला एका महिलेने प्रचंड मारहाण केली.
या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रदीप भणगे, ठाणे : कल्याणमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Related News
‘अंधभक्त’ म्हणणाऱ्यांना ईशा कोपिकरने सुनावलं; प्रेमात आंधळे होऊ शकता तर देशाच्या प्रेमात का नाही?
अभिनेत्री ईशा कोपिकर सध्या तिच्या सोशल मीडिया पोस...
Continue reading
Keniya Helicopter Crash : हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना; बड्या अधिकाऱ्यासह 7 जणांचा मृत्यू
नैरोबी : आफ्रिकन देश केनियामध्ये हेलिकॉप्टर कोसळून मोठी दु...
Continue reading
तृणमूलचा भाजपला मोठा धक्का; ममता बॅनर्जींचं जोरदार कमबॅक, विधानसभा निवडणुकीनंतर दोनच महिन्यांत पुन्हा फिरलं वारं
पश्चिम बंगालच्या राजकारणात विधान...
Continue reading
श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत? सूरदास यांच्या दाव्याने चर्चेला उधाण
श्रीमद् भागवत ग्रंथाच्या वाचनामुळे अपघाती मृत्यू टळ...
Continue reading
Amit Thackeray : ‘मुलींचा हात धरल्यावर मारणारच’; ABVPला अमित ठाकरेंचा इशारा, कॉलेजच्या प्रश्नांवरही सरकारला घेरलं
Amit Thackeray : विलेपार्ल्या...
Continue reading
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिला अपात्र, आता फक्त इतक्यांनाच मिळणार लाभ
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच...
Continue reading
ChatGPT ला मुलीबद्दल विचारला प्रश्न; काही मिनिटांतच पोलीस तरुणाच्या घरी, AI च्या वापरावर पुन्हा प्रश्नचिन्ह
आजच्या डिजिटल युगात ChatGPT आणि इतर AI टूल...
Continue reading
अमेरिकेकडून रात्रीच्या अंधारात इराणविरोधात छुपा डाव; होर्मुझच्या सामुद्रधुनीतील 'गुप्त ऑपरेशन'चा दावा
इराण आणि अमेरिकेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ...
Continue reading
Shivsena Supreme Court Hearing : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा’, शिवसेना कोणाची? सर्वोच्च न्यायालयात आज ठाकरे गटाचा अंतिम युक्तीवाद
Shivse...
Continue reading
ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा! मुलाला संपत्तीतून बेदखल करता येणार; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
भारतात वाढत्या वयासोबत ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्ष...
Continue reading
EPFO PF Rules : उपचार, शिक्षण, लग्नासाठी आता झटपट काढता येणार PF; EPFO ने बदलले नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती
EPFO PF Rules : कर्मचारी भविष्य ...
Continue reading
या 5 आरोग्यदायी बियांचा रोजच्या आहारात करा समावेश; शरीराला मिळेल भरपूर पोषण
Healthy Seeds Benefits : बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याची काळ...
Continue reading
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या (Shiv Sena) माजी नगरसेवकाला एका महिलेने प्रचंड मारहाण केली.
या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
राणी कपोते असं मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव आहे.
तर मोहन उगले असं माजी नगरसेवकाचं नाव आहे. रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरुन दोघांमध्ये वाद झाला.
यावेळी महिलेने माजी नगरसेवकाला प्रचंड मारहाण केली.
मारहाण करणारी महिला ही शिवसेनेचीच महिला कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत पक्षश्रेष्ठी काही कारवाई करतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
नेमकं काय घडलं?
कल्याण पश्चिमेतील मोहिंदर सिंग काबूल सिंग परिसरात एका रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होता.
हा कार्यक्रम काल सायंकाळी होता. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर हे काही कामानिमित्त बाहेर असल्याने
त्यांचे सुपुत्र वैभव भोईर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होता.
त्याठिकाणी माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
त्याठिकाणी शिवसेना महिला कार्यकर्त्या राणी कपोते पोहचल्या. त्यांनी सांगितले की, या कामाचा पाठपुरावा मी केला आहे.
त्यानंतर त्याठिकाणी जोरदार गोंधळ झाला. त्यावर माजी नगरसेवक उगले यांनी या कामाचा पाठपुरावा मी केला असल्याचा दावा केला होता.
हा राग राणी कपोते यांनी धरला.सोमवारी दुपारी अहिल्याबाई चौकात राणी कपोते आणि मोहन उगले आमनेसामने आले.
राणी कपोते यांनी तू मला शिव्या का देतो? माझ्यासोबत गैरवर्तन काय करतो? असं म्हणत उगले यांच्यावर थेट हल्ला चढवला.
यात उगले यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राणी कपोते यांनी उगले यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.
हा वाद इतका टोकाला पोहोचेल असं कुणाला वाटलं नव्हतं.
दरम्यान महाराण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.