‘तुम्ही कशाला खुर्च्या उबवताय?’ ठाकरेंच्या सेनेचा फडणवीसांना सवाल; म्हणाले, ‘स्वतःच्या कॅबिनेटपासून…’

'तुम्ही कशाला खुर्च्या उबवताय?' ठाकरेंच्या सेनेचा फडणवीसांना सवाल; म्हणाले, 'स्वतःच्या कॅबिनेटपासून...'

“राज्यात सरकारात आणि सरकारबाहेर वाढलेल्या दंगेखोरीवर कारवाई करण्याऐवजी त्याकडे डोळेझाक करणे हेच सरकारी धोरण आहे,”

असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

Uddhav Thackeray Shivsena On CM Devendra Fadnavis: “नागपुरातील दंगलखोरांना सोडणार नाही

Related News

व त्यांच्याकडूनच नुकसानभरपाई वसूल करू,

असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मात्र दंगलखोरांवर कारवाई करणार म्हणजे ते नक्की काय करणार?

खरे दंगलखोर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत व कारवाईचा बडगा सगळ्यात आधी त्यांच्यावरच उगारला जायला हवा.

औरंगजेबाची कबर तोडण्यासाठी चिथावणी देणारे मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत.

हे मंत्री, भाजपचे आमदार, मिंधे गटातील बाटगे हिंदुत्ववादी यांनी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवले व त्यातून नागपुरात दंगलीची ठिणगी पडली,”

असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

ठरवून भाजपवाल्यांनीच मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न केला

“खोटे नरेटिव्ह निर्माण करायचे व लोकांत गोंधळ उडवायचा हे भाजप आणि त्यांच्या लोकांचे धोरण आहे.

पाच वर्षांपूर्वी सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या केली.

या आत्महत्येस ‘हत्या’, ‘खून’ वगैरे ठरवून भाजपवाल्यांनीच मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणात रिया चक्रवर्ती भरडली गेली. तिच्यावर ठपका ठेवून तुरुंगात ढकलले.

आता सीबीआयने सुशांतसिंह प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला.

या प्रकरणात संशयास्पद असे काहीच आढळले नसल्याचे सीबीआयने त्यांच्या अहवालात म्हटले व रिया चक्रवर्तीला क्लीन चिट दिली,

पण मग रिया चक्रवर्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलून जी बदनामी केली गेली, तुरुंगवास भोगायला लावला त्याची भरपाई कोणी करायची?

येथेही सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात गुन्हे दाखल करणे,

याचिका दाखल करणे वगैरे प्रकार केले, पण त्यापेक्षाही भयंकर प्रकार भाजप व त्याच्या भाडोत्र्‍यांनी केले,”

असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

 

Related News