Ladki Bahin Yojana: राज्यात सत्ताधाऱ्यांना मोठी मदत करून गेलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर. आता प्रतिनिधी थेट दारात येऊन..
वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर: (Ladki Bahin Yojana) लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील महिला वर्गाला
आर्थिक पाठबळ देण्यातं काम गेले काही महिने महाराष्ट्र शासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.
Related News
नवी दिल्ली | प्रतिनिधी –
भारतीय रेल्वेने चारधाम यात्रा आता अधिक सोपी आणि आरामदायक करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून २७ मेपासून ‘भारत गौरव डीलक्स टुर...
Continue reading
चेन्नई | प्रतिनिधी –
तामिळनाडूच्या मच्छिमारांवर पुन्हा एकदा श्रीलंकन लुटारूंकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
अक्कराईपेट्टै येथील सेरुधुर गावातील ३० मच्छिमार माशांच्या शोधार्थ ...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी –
भारत सरकारने देशाच्या समुद्री सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानच्या ध्वजाखाली चालणाऱ्या कोणत्याही जहाजाला आता भारतीय ...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी –
गेल्या काही महिन्यांपासून गगनाला भिडलेल्या सोन्याच्या किमतींमुळे सामान्य ग्राहक हतबल झाले होते.
मात्र, आता सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली ...
Continue reading
मुजफ्फरपूर (बिहार) | प्रतिनिधी –
बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील मुशहरी नाथा भागातून एक अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे.
येथे एका क्रूर पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीचा न...
Continue reading
शिरगाव (गोवा) | प्रतिनिधी –
गोव्यातील शिरगाव येथे श्री लैराई देवीच्या वार्षिक यात्रेदरम्यान शुक्रवारी रात्री भीषण चेंगराचेंगरी झाली.
या दुर्घटनेत सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झा...
Continue reading
वॉशिंग्टन | प्रतिनिधी –
अंतराळात चालणाऱ्या कठीण मोहिमा, तांत्रिक अडचणी आणि पृथ्वीपासून हजारो किलोमीटर दूर एकाकी जीवनशैली...
या सगळ्यांमध्येही कधीकधी काही आनंदाचे क्षण झळकतात, आणि...
Continue reading
अकोला, प्रतिनिधी |
अकोला शहरातील जुना शहर परिसरातील पोळा चौकात आपसी वादातून एका युवकावर चाकूने
जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शेख नाजिम शेख खालिक (रा. सोनटके प्...
Continue reading
अकोला, प्रतिनिधी | अकोला शहरातील नवीन उड्डाणपुलावर घडलेल्या दुचाकी अपघातात एका
२५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे.
संतोष वनवासे (वय २५, मूळ रहिवासी उ...
Continue reading
झांसी, प्रतिनिधी |
उत्तर प्रदेशातील झांसी शहरातील प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लग्नाच्या कार्यक्रमात डीजे
वाजवल्याच्या कारणावरून मोठा गोंधळ उडाला. खैरा मोहल्ल्यात ऋतिक ना...
Continue reading
स्पोर्ट्स डेस्क | मुंबई
IPL 2025 हंगाम चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) अत्यंत निराशाजनक ठरला. ऋतुराज गायकवाडच्या
दुखापतीनंतर पुन्हा एकदा 43 वर्षीय महेंद्रसिंह धोनीकडे कर्णधारपद सोपव...
Continue reading
इस्लामाबाद | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर,
पाकिस्तानमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि घबराट पसर...
Continue reading
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिला वर्गाला पाठबळ देत सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातील
विधानसभा निवडणुकीमध्ये या योजनेच्या माध्यमातून सरशीसुद्धा मिळवल्याचं पाहायला मिळालं.
एकिकडे योजनेच्या माध्यमातून महिला वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असतानाच दुसरीकडे याच योजनेमध्ये
अनेक महिलांच्या नावे बनावट खाती उघडून चुकीच्या पद्धीतनं पैसे लाटण्यात आल्याची प्रकरणंही समोर आली.
हाच गैरप्रकार थांबवण्यासाठी म्हणून आता शासनानं काही कठोर नियमावली आखत योजनेतील लाभार्थी महिलांची पुनर्पडताळणी करण्यास सुरुवात केली.
या माध्यमातून आर्थिक निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना मिळणारा फायदासुद्धा थांबवण्यासाठी शासनानं पावलं उचलली.
‘चारचाकी’वाल्या बहिणींच्या दारी प्रतिनिधी…
फेरपडताळणी अंतर्गतच आता अंमलबजावणीसंदर्भातील माहिती समोर आली असून कुटुंबात चारचाकी वाहन
असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण आता बंद होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ज्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही,
असं सुरुवातीपासून स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र या निकषाकडे दुर्लक्ष करून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला.
परिणामी, शासनानं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा आधार घेत चारचाकी वाहन असलेली यादी घेऊन लाडकी बहीण
योजनेत सहभागी असलेल्या घरांचा आढावा घेण्याचं काम सुरू केलं.
अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही तपासणी सुरू करण्यात आली असून,
लातूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 4398 महिलांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली.
त्यात 2763 महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असल्याचं निदर्शनास आलं.
ज्यामुळं आता ही नावं योजनेतील लाभार्थींच्या यादीतून वगळण्यात येणार आहेत.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक महिलांची नावं या यादीतून येत्या काळात वगळली जाणार असून,
चुकीचे आर्थिक निकष सादर करणाऱ्या महिलांचा यामध्ये समावेश असेल.
दरम्यान या योजनेतून स्वत:हून माघार घेण्याचा पर्यायही शासनानं महिलांना दिला असून,
अर्ज मागे घेण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे.