अकोला: ऑटोच्या धडकेवरून युवकाचा खून, सात आरोपी अटकेत

अकोला: ऑटोच्या धडकेवरून युवकाचा खून, सात आरोपी अटके

अकोला शहरातील जेतवन नगरमध्ये किरकोळ वादातून हिंसाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑटोच्या धडकेवरून वाद उफाळल्याने तिघा युवकांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात करण शितळे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओमध्ये हल्लेखोर करण आणि त्याच्या मित्रांवर हल्ला करताना स्पष्टपणे दिसत आहेत. खदान पोलिसांनी या प्रकरणी एकूण आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, त्यापैकी चार अल्पवयीन असल्याचे समजते.

पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे.

Related News

मनोज केदारे, पोलीस निरीक्षक, खदान पोलीस स्टेशन

Related News