पातूरच्या शेख रफीक शेख चांद यांचे गो-रक्षण कार्य गौरवस्पद

पातूरच्या शेख रफीक शेख चांद यांचे गो-रक्षण कार्य गौरवस्पद

पातूर (प्रतिनिधी)पातूर तालुक्यातील शेतकरी शेख रफीक शेख चांद यांनी

माणुसकीचा आदर्श ठेवत एका बेवारस गायीचे रक्षण केले.

शेख रफीक यांच्या अमराई पातूर परिसरातील शेतात काही दिवसांपासून एक

Related News

पांढऱ्या रंगाची गाय फिरताना दिसत होती.

सुरुवातीला त्यांनी तिला शेताबाहेर हुसकावून लावले, मात्र ती पुन्हा शेतात परत येत होती.

 माणुसकीचा परिचय देत गायीचे रक्षण

शेतकरी शेख रफीक यांनी गायीला कोणतीही हानी होऊ नये म्हणून

तिला सुरक्षितपणे आपल्या शेतात बांधून ठेवले. त्यांनी परिसरातील इतर

शेतकरी आणि संबंधित व्यक्तींना विचारले, मात्र कोणीही तिच्या मालकीचा दावा केला नाही.

यानंतर त्यांनी ही माहिती पत्रकार दूल्हे खान युसूफ खान यांना दिली.

दोघांनी मिळून गायीला पातूर पोलीस स्टेशनमध्ये आणले आणि सुरक्षिततेसाठी पोलीसांच्या हवाली केले.

 पोलीस आणि गौशाळेचे सहकार्य

पोलीस निरीक्षक हनुमंत दोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सत्यजित ठाकूर,

संबोधित इंगळे आणि ज्ञानेश्वर चिकटे यांच्या सहकार्याने

गायीला पातूर वनराई गौशाळा बहुउद्देशीय संस्थेत सुखरूप पाठवण्यात आले.

👉 शेख रफीक शेख चांद आणि पत्रकार दूल्हे खान यांचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

Related News