अकोला : किरकोळ कारणावरून युवकावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

अकोला : किरकोळ कारणावरून युवकावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

अकोला – शहरातील जेतवन नगरमध्ये किरकोळ कारणावरून एका युवकावर चाकू हल्ला करण्यात

आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करण शीतळे असे मृत युवकाचे नाव असून,

त्याच्यासोबत असलेले दोन साथीदारही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

Related News

हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम

करण शीतळे पगार घेऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडला होता.

काही वेळानंतर त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर चाकूने हल्ला करण्यात आला.

करणने आईला फोन करून मदतीची याचना केली.

आई घटनास्थळी पोहोचण्याआधीच करण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

सीसीटीव्हीमध्ये कैद संपूर्ण हल्ला

हल्ल्याचा पूर्ण व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे, ज्यामध्ये हल्लेखोर करण आणि त्याच्या साथीदारांवर हल्ला करताना स्पष्ट दिसत आहेत.

पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच खदान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, फरार हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. मात्र, हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Byte : मृत युवकाची आई –

“करणने मला फोन करून सांगितले की, आई, मला मारहाण सुरू आहे,

लवकर ये. पण मी पोहोचण्याआधीच तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता…”

या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिस अधिक तपास करत आहेत.

Related News