मुर्तीजापूर, २२ मार्च २०२५: शहरातील शिवाजी नगरमध्ये उभी असलेली २४ लाख रुपये किमतीची जेसीबी 3DX
चोरीला गेल्याची घटना १२ डिसेंबर रोजी घडली होती. या प्रकरणाचा तपास करत मुर्तीजापूर पोलिसांनी
केवळ काही दिवसांतच ४ आरोपींना अटक करून चोरी गेलेली जेसीबी जप्त केली.
Related News
उद्योगांमधून सोडले जाणारे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी कडक नियम लवकरच लागू
एसटी बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न
नाशिकमध्ये आरोपी ‘क्रिश’ची थरारक पलायनकथा
“पाकिस्तानच्या विनाशापर्यंत दाढी-मिशी नाही”
जातनिहाय जनगणनेसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय
इंस्टाग्रामवरील सुपरस्टार्स
मुख्यमंत्र्यांची लेक दिवीजा दहावीत चमकली
29 ऑगस्टला मुंबईत आमरण उपोषण!
फळांचा राजा गणराया चरणी!
नेहानेच अट घातली होती’; मेलबर्न शो वादावर आयोजकांचा आणखी खुलासा, काय म्हणाली नेहा कक्कर?
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण; खरेदीसाठी सुवर्णसंधी
दादरमधील नाबर गुरुजी विद्यालयाच्या बंदतेने मराठी शाळांचे भविष्य अधांतरी
घटना कशी उघडकीस आली?
फिर्यादी हेमंत ज्ञानेश्वर पिंपळे (३५) यांनी १३ डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानुसार, MH 30 AZ 5276 क्रमांकाची जेसीबी त्यांच्या घरासमोर उभी असताना अज्ञात चोरट्यांनी ती लंपास केली.
यावरून पोलिसांनी कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तांत्रिक तपास आणि जलद अटक
मुर्तीजापूर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपींचा माग काढला.
वाशीम शहर पोलिसांच्या सहकार्याने खालील चार आरोपींना अटक करण्यात आली –
-
सुखदेव उर्फ संचित उत्तम गायकवाड (२८),
-
नामदेव उत्तम गायकवाड (२४) (दोघे रा. करंजी, महागाव, जि. यवतमाळ),
-
ज्ञानेश्वर बंडू कच्छवे (२४) (रा. ब्राम्हणवाडा, वाशीम),
-
महादेव बबन पाटील (२३) (रा. वाशीम).
जेसीबी परत मिळाली – पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक!
अटक आरोपींकडून २४ लाख रुपये किमतीची जेसीबी 3DX जप्त करण्यात आली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पोलिसांची टीम
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे
आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे –
-
पोलीस निरीक्षक – अजित जाधव
-
पोलीस उपनिरीक्षक – गणेश सूर्यवंशी
-
पोलीस हवालदार – सुरेश पांडे, नंदकिशोर टिकार, मंगेश विल्हेकर
-
पोलीस कॉन्स्टेबल – सचिन दुबे, गजानन खेडकर, सतीश चाटे, नामदेव आडे
नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास दृढ
या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे मुर्तीजापूर पोलिसांनी पुन्हा एकदा चोरट्यांचे कंबरडे मोडले आहे!
या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास अधिक दृढ झाला आहे.