अकोट: मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेअंतर्गत मिळालेला निधी लाभार्थींच्या खात्यात जमा होत असताना काही बँका हा
निधी थेट कर्ज कपात म्हणून वजा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ढगा (ता. अकोट) येथील देवकन्या इंगळे यांच्या इंडस्लॅण्ड बँक, अकोट शाखेतील खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे ₹3000 जमा झाले होते.
Related News
भाजप आमदार महेश बालदी यांना ३ वर्षांचा सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा मोठा निर्णय, शिक्षेनंतर लगेच जामीन मंजूर!२०१० मधील मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणात आमदारासह चा...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्यातील आणखी ६ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश; एकूण संख्या ३१० वर
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मह...
Continue reading
वकाना येथे २२ नोव्हेंबरला राष्ट्रप्रथम प्रतिष्ठानचा भव्य सोहळा; श्रीकांत शिंदे, सचिन अहिर राहणार उपस्थित!
सैनिक परिवारांचा होणार सन्मान; कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन, संस्थापक अध्य...
Continue reading
शरद पवारांची राष्ट्रवादी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार? संजय राऊतांच्या ‘अजून’ शब्दाने राजकीय वर्तुळात खळबळ!
डीलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळेंची वेगळी भूमिका; इंडिया आघाडीतील एकजु...
Continue reading
हद्दवाढीनंतर प्रथमच प्रभाग क्रमांक ४ मध्ये कचरा संकलनाची गाडी दाखल; मोठी उमरीकरांना दिलासा!
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेची कचरा गाडी पोहोचली परिसरात; नियमित स्वच्छता आण...
Continue reading
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! संकटाच्या काळात सरकार ठामपणे पाठीशी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळ आणि नैसर्गिक संकटांचा सामना करत असता...
Continue reading
न्यायक्षेत्रात यशासाठी शॉर्टकट नाही; प्रामाणिकपणा आणि नैतिकताच खरी गुरुकिल्ली! – माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड
यवतमाळच्या विधी महाविद्यालयात डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे कायदा आ...
Continue reading
भारताच्या व्यापार तुटीचा आकडा ४० अब्ज डॉलरवर! रुपयावर वाढणार दबाव की सेवा क्षेत्र आणि परदेशी गुंतवणूक देणार आधार?
भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर सध्या व्यापार तुटीचे मोठे आव्हान उभे र...
Continue reading
मोठी राजकीय घडामोड! फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित...
Continue reading
Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिष्णोई गँगशी संबंध असल्याचा संशय, दोघांना अटक!
बॉलिवूडचे महानायक Amitabh Bachchan यांच्य...
Continue reading
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राजकीय हालचालींना वेग; पार्थ पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं? आमदार शरद मांडेकरांनी दिली माहिती!
राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग...
Continue reading
मंगरुळपीरमध्ये दैनिक अजिंक्य भारतच्या ‘अजिंक्यदीप’ दिवाळी विशेषांकाचे दिमाखात विमोचन!
नगराध्यक्ष अशोकभाऊ परळीकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन; साहित्य, संस्कृती आणि समाजप्...
Continue reading
मात्र, संबंधित बँकेने ती संपूर्ण रक्कम कर्जाच्या हप्त्यात वजा केली आहे.
बँकेकडून कपातीचे कारण – वरिष्ठ कार्यालयाचा आदेश?
या घटनेबाबत इंगळे यांनी बँक मॅनेजरशी विचारणा केली असता, “वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार कपात करण्यात आली आहे”,
असे उत्तर देण्यात आले. या प्रकारामुळे इतरही अनेक लाडल्या बहिणींच्या खात्यातील रक्कम कापली गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
लाडल्या बहिणींच्या मदतीसाठी सरकारने लक्ष द्यावे – नागरिकांची मागणी
मुख्यमंत्री एकीकडे महिलांना आर्थिक मदत देत असताना, बँका त्याच रकमेवर कर्ज कपात करत
असल्याने लाभार्थींना दिलेला निधी योग्य प्रकारे मिळत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
तसेच जिल्हाधिकारी आणि बँकिंग प्राधिकरणांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी आता होत आहे.
“भावाने पाठवलेली रक्कम मिळालीच नाही” – इंगळे यांची खंत
“माझ्या खात्यात जमा झालेले पैसे मी काढण्यासाठी गेले असता, बँकेने ते कर्ज कपातीसाठी वजा केले.
हे ऐकून मला खूप वाईट वाटले. भावाने दिलेली रक्कम मला मिळाली नाही.”
– देवकन्या इंगळे, लाडली बहीण, ढगा (ता. अकोट)
सरकारच्या निधीवर बँकांचाच डल्ला? या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी
आणि लाडल्या बहिणींना त्यांचा निधी संपूर्ण मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.