गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती?

तिखट लालचुटुक मिरच्यांची आवक वाढल्या खऱ्या पण काही बाजारसमित्यांमध्येच भाव मिळत आहे. अकोला, मुंबई, नागपूर, नांदेड अशा सर्व बाजारसमित्यांमध्ये मिरच्यांची आवक होतेय.

Red Chilly Market: राज्यात मिरचीची आवक कशी आहे? भाव काय मिळतोय? वाचा

राज्यात सध्या वाळलेल्या लाल मिरच्यांची मोठी आवक होत आहे.

नागपूर, मुंबईच्या मार्केटमध्ये गावरान, स्थानिक मिरच्यांचा एकच ठसका उठलाय.

सध्या लाल मिरच्यांची आवक कमी असली तरी शुक्रवारी मिरचीची रेकॉर्डब्रेक आवक नोंदवण्यात आली आहे.
चरकी, हायब्रीड मिरच्याही बाजारात मोठ्या प्रमाणात येतायत. नागपूरच्या बाजारात
शुक्रवारी 2757 क्विंटल मिरच्यांची आवक होत असून साधारण 12250 रुपयांचा भाव मिळाला.
मुंबईच्या बाजारसमितीत लोकल लाल मिरच्यांना 21 हजार रुपयांचा भाव मिळाला.
शुक्रवारी बाजारपेठेत 4789 क्विंटल लाल मिरचीची आवक होत आहे.
तिखट लालचुटुक मिरच्यांची आवक वाढल्या खऱ्या पण काही बाजारसमित्यांमध्येच भाव मिळत आहे.
अकोला, मुंबई, नागपूर, नांदेड अशा सर्व बाजारसमित्यांमध्ये मिरच्यांची आवक होतेय.

Related News