Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरु असलेल्या वाढीला ब्रेक लागला आहे.
सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली.
Gold Rate मुंबई : सोन्याच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.
Related News
-शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर
अमरावती, दि. 10 : गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मुलभूत अधिकार आहे.
त्यानुषंगाने शासनाकडून निपूण महाराष्ट्र अभ...
Continue reading
अकोला (गंगानगर बायपास):
गत १० वर्षांपासून भक्तीमय उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या सालासर बालाजी मंदिरात
यंदा हनुमान जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक १२ एप्रिल...
Continue reading
तेल्हारा (९ एप्रिल २०२५):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ...
Continue reading
अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची "मुंबई-अमरावती-मुंबई" विमानसेवा आता सुरू झाली आहे.
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्...
Continue reading
अकोट (दि. ९ एप्रिल २०२५):
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था, अकोट याच्या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडीत तसलीम ताहेर पटेल
यांची चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या का...
Continue reading
बार्शीटाकळी, जि. अकोला (प्रतिनिधी):
आसरा माता यात्रा,अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील एक प्रसिद्ध धार्मिक उत्सव...या यात्रेदरम्यान,
अनेक भक्त आणि भाविक ...
Continue reading
सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावाती...
Continue reading
अकोला, दि. १० (प्रतिनिधी):
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ एप्रिल रोजी
रात्री एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आ...
Continue reading
मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे ...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि माजी आमदार रामाभाऊ कराळे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना
पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हि...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न शिवनी येथून अकोल्याकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाचे
अचानक नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.
डॉ....
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
अकोट तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांबाबत तक्रारीनंतर चौकशी झाली
आणि ग्रामपंचायत सचिवासह इतर चार व्यक्तींवर उपविभागीय अधिकारी अकोट यांनी द...
Continue reading
त्यामुळं सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे.
एकीकडे शेअर बाजारात मोठी घसरण सुरु असल्यानं सोन्याच्या दरात वाढ सुरु होती.
जानेवारीपासून सोन्याच्या दरात जवळपास 12 हजारांची वाढ झाल्याचं समोर आलं होतं.
अखेर सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचे दर 89796 रुपयांवर पोहोचले होते.
मात्र, त्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा कमावण्याचं धोरण स्वीकारल्यानं सोन्याच्या दरात 2000 रुपयांची घसरण एमसीएक्स वर पाहायला मिळाली.
एमसीएक्सवर सोन्याचा दर 87785 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. विशेष बाब 2025 मध्ये सोन्याच्या दरात 14 टक्के तेजी पाहायला मिळाली.
तर, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याच्या दरात 15 टक्क्यांची वाढ झाली आहे.
सोन्याच्या दरात पुन्हा तेजी येणार?
तज्ज्ञांच्या माहिती नुसार सोन्याच्या दरातील तेजीचं प्रमुख कारण परताव्याची हमी हे आहे.
गाझापट्टीत वाढता संघर्ष असल्यानं सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होण्यास मदत झाली.
अमेरिकेची बँक फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनं सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
अमेरिकन फेड रिझर्व्ह नुसार आर्थिक विकास कमी राहील, यामुळं महागई वाढेल. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळेल.
तज्ज्ञांनी सोन्याचे दर घटतील तेव्हा गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
एसएएस वेल्थ स्ट्रीटच्या संस्थापक सुंगधा सचदेव यांनी गाझा पट्टीतील वाढता संघर्ष आणि अमेरिकेतील मंगीची चिंता,
टॅरिफमुळं वाढणारी महागाई यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाली.
काही तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमतीवर अजून दबाव राहू शकतो.
या मागं रुपयाचं मजबूत होणं हे देखील आहे.
सोन्याच्या किमतीला 88000 रुपयांची लेवल योग्य आहे, असं ते म्हणाले.
शेअर बाजारात तेजी
सप्टेंबर 2024 मध्ये सेन्सेक्सनं उच्चांक गाठला होता. त्या उच्चांकानंतर भारतीय शेअर बाजारात अनेकांनी पैसे गुंतवले.
मात्र, त्यानंतर सलग गेले सहा महिने बाजारात घसरण सुरु आहे.
याचवेळी 17 मार्च ते 21 मार्चला संपलेल्या 5 दिवसांच्या काळात शेअर बाजारात पुन्हा तेजी आली आहे.