Nanded Crime : आमच्या मुलीशी का बोलतोस, असे म्हणत नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण केली होती.
यानंतर तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.
Nanded Crime : आमच्या मुलीशी का बोलतोस, असे म्हणत नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण केली.
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
शिवाय गावात बेइज्जत करतो अशी धमकी देखील दिली. याच भीतीपोटी एका 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास
घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास
नांदेड (Nanded News) शहरालगत असलेल्या सुगांव येथे घडली.
या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात मुलीसह सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन प्रभू शिंदे असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन शिंदे या तरुणाचे थुगांव येथील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरु होते.
तीन ते चारवर्षा पूर्वी दहावीत शिकत असताना दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
एक वर्षापूर्वी मुलीच्या घरच्यांना त्यांच्या या प्रेम प्रकरणाबाबत माहिती झाली. यावेळी दोघांची घरच्यांनी समजूत काढली होती.
तरुणाला धमकी देत मारहाण
सहा महिन्यांपूर्वी मुलीच्या चुलत भावाने मुलीला फोनवर का बोलतो, असे म्हणत नितीन याला मारहाण केली होती.
त्यानंतर 18 मार्च रोजी तो कामावरून घरी परतत असताना मुलीच्या घरच्या लोकांनी त्याला पुन्हा मारहाण केली.
आम्ही देशमुख आहोत, तुम्ही पाटील आहात, तुमची औकात नाही,
रस्त्यावर आणून बेईज्जत करतो, चिरून टाकतो अशी धमकी देखील त्याला देण्यात आली.
मुलीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल
या भीतीपोटी नितीन शिंदे या तरुणाने गुरुवारी राहत्या घरी सिलिंगला दोरी बांधली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्रभू शिंदे यांच्या तक्रारीवरून ज्ञानदेव भोसले, संतोष भोसले, विक्रम भोसले, अर्जुन भोसले, नितीन भोसले, संतोष भोसले यांच्यासह
मुलीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेम प्रकरणातून मुलाने आत्महत्या केल्याने नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहत.