नवी दिल्ली: अनुसूचित जाती आणि वाल्मिकी समाजातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दलित इंडियन
चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) ही संस्था पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाही प्रसिद्ध उद्योजक, डिक्कीचे नॅशनल कौन्सिल मेंबर आणि महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. सुगत वाघमारे यांनी दिली आहे.
आज राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मखवाना यांची भेट घेत असताना, डॉ. वाघमारे यांनी अनुसूचित जातीच्या तरुणांमध्ये वाढत्या बेरोजगारीवर चिंता व्यक्त केली.
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
त्यांनी स्पष्ट केले की डिक्की अनुसूचित जाती समुदायाच्या युवकांना उद्योजकतेच्या दिशेने प्रेरित करत आहे.
त्यामुळे सरकारने उद्योजकता कार्यक्रमांना अधिक पाठिंबा द्यावा, अशी मागणी त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे केली.
यावेळी अनुसूचित जातीच्या आर्थिक शाश्वततेवरही सखोल चर्चा झाली.
यानंतर राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. वेंकटेशन यांचीही भेट घेत वाल्मिकी समाजातील तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
विशेषतः सेप्टिक टँक आणि मॅनहोल साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत चर्चा झाली.
सक्शन मशीन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवून सफाई कर्मचारी आणि वाल्मिकी समाजाच्या उत्थानासाठी डिक्की महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
त्यामुळे सरकारनेही या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी डॉ. वाघमारे यांनी केली.
डॉ. वाघमारे यांनी स्पष्ट केले की, अनुसूचित जाती आणि वाल्मिकी समाजातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी डिक्की सातत्याने कार्यरत राहणार आहे.