पत्रकार विठ्ठलराव महल्ले यांच्यावर हल्ल्याचा तीव्र निषेध; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

पत्रकार विठ्ठलराव महल्ले यांच्यावर हल्ल्याचा तीव्र निषेध; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

पातुर | प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर विठ्ठलराव महल्ले यांच्यावर बुधवारी रात्री भ्याड हल्ला करण्यात आला.

रात्री ११ वाजताच्या सुमारास ते आपले काम आटोपून घरी जात असताना

Related News

खदान परिसरात तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या मोटरसायकलला अडवून अमानुष मारहाण केली.

गुन्हेगारी वाढली, पोलिस प्रशासन अपयशी?

अकोला जिल्ह्यात सतत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून,

पोलिस प्रशासन गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे.

विशेषतः पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याने लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आला आहे,

अशी भावना पत्रकार समुदायातून व्यक्त होत आहे.

पातुर तालुका पत्रकार संघटनेचा निषेध व आंदोलनाचा इशारा

या घटनेच्या निषेधार्थ पातुर तालुक्यातील पत्रकार संघटनेने एकत्र येत

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
“जर हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार तातडीने गुन्हा दाखल झाला नाही,

तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा पत्रकारांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन; कारवाईची मागणी

पातुर तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी व तहसीलदार

डॉ. राहुल वानखडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात पत्रकार संघटनेचे प्रमुख सदस्य आणि तालुक्यातील अनेक मान्यवर पत्रकार सहभागी झाले होते.

पत्रकार संरक्षणासाठी कठोर धोरण आवश्यक

पत्रकार महल्ले यांच्यावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण पत्रकार समुदायात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

त्यामुळे सरकार व पोलीस प्रशासनाने पत्रकारांवरील हल्ले थांबवण्यासाठी विशेष धोरण आखावे,

अशी मागणी पत्रकार संघटनेने केली आहे.

🔴 “पत्रकार हा समाजाच्या न्यायासाठी लढणारा योद्धा असतो.

त्याच्यावर हल्ले होणे म्हणजे लोकशाहीला धोका निर्माण होणे होय.

त्यामुळे सरकारने यावर गंभीर पावले उचलून पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी,” असे मत पत्रकार संघटनेने व्यक्त केले आहे.

जर आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही, तर पातुर तालुक्यातील पत्रकार मोठे आंदोलन उभारतील, असा इशारा देण्यात आला आहे.

Related News