हिरपूर: महाराष्ट्र शासनाने नाथपंथीय समाजाच्या आर्थिक विकासासाठी स्थापन केलेल्या वसंतराव नाईक
विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाला नाथपंथीय समाजाच्या आराध्य दैवतांचे नाव द्यावे,
अशी मागणी युवा नाथ संघटना महाराष्ट्र आणि नाथ समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
नाथपंथीय समाजाच्या गुरु आणि आराध्य दैवत परमपूज्य गुरु गोरक्षनाथ महाराज यांचे नाव या महामंडळाला देण्यात यावे,
अशी मागणी उपविभागीय अधिकारी, मुर्तिजापूर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शासनाच्या निर्णयात सुधारणा करण्याची मागणी
महामंडळाच्या स्थापनेसाठी शासनाने “परमपूज्य गंगनाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ”
हे नाव निश्चित केले आहे. मात्र, नाथपंथीय समाजाचे प्रमुख गुरु गोरक्षनाथ महाराज असल्याने,
या महामंडळाला “गुरु गोरक्षनाथ आर्थिक विकास महामंडळ” हे नाव द्यावे,
अशी मागणी शासन निर्णय क्रमांक महाम/२०२४/८०. प्रक्र/ महामंडळे मध्ये शुद्धिपत्रक काढून करण्यात आली आहे.
नाथपंथीय समाजाच्या वतीने निवेदन सादर
नाथपंथीय समाजाच्या या मागणीसाठी युवा नाथ संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष राहुल इंगळे, तसेच
डॉ. संगीता सुरंसे, सुबोध वंजारे, पत्रकार दिलीप तिहीले, स्वप्निल पाठक, नागेश जाधव, गजानन वाडेकर,
गणेश चिलवंत, हर्षवर्धन पारस्कर, दिवाकर गौरकर, अभिषेक पाठक,
अंजली कासार यांच्यासह समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी, मुर्तिजापूर यांना निवेदन दिले.
शासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
नाथपंथीय समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी उभारलेल्या या महामंडळाला त्यांच्या प्रमुख
गुरुंचे नाव मिळावे, यासाठी शासनाने लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावा,
अशी मागणी समाज बांधवांकडून होत आहे.