रेल्वे पोलीस असतात तरी कुठे? प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
अकोट – तीन दिवसांपूर्वी अकोला रेल्वे स्थानकावर हेमंत गावंडे यांच्या हत्येच्या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे
वातावरण निर्माण केले आहे. त्यातच अकोट-अकोला रेल्वेमार्ग आणि अकोट रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.
अकोट रेल्वे स्थानकावर एकही सुरक्षा कर्मचारी दिसत नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे. रेल्वे पोलीस आणि
Related News
“मी ब्रिजभूषण प्रकरणातील सहा पीडितांपैकी एक आहे” – Vinesh Phogat चा खळबळजनक आरोप; रेसलिंगमध्ये पुनरागमनापूर्वी मोठा वाद
भारताची आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये...
Continue reading
इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला तब्बल एक लाखांहून अधिक वऱ्हाडी; शाही सोहळा ठरला चर्चेचा विषय
प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार
Continue reading
इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा विवाहसोहळा ठरला चर्चेचा विषय; संस्कृती जपल्याचे कौतुक तर खर्चावरून पुन्हा टीका
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार
Continue reading
इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा: मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्र्यांपर्यंत दिग्गजांची हजेरी | पाहुण्यांची मोठी यादी चर्चेत
(Sangamner Wedding News: 100 एकरांवर भव्य विवाह...
Continue reading
अमेरिकेचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब! ट्रम्प यांच्या नव्या घोषणेनं जगात खळबळ | युरोपियन कार-ट्रकवर 25% कर लागू
(USA Trade Policy Update: डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, जागतिक अर्थव्यवस्...
Continue reading
कलिंगडाबाबत मोठी चर्चा: कापलेलं टरबूज किती दिवस ताजं राहतं? आरोग्यास धोका किती? संपूर्ण माहिती
(Watermelon Facts: मुंबईतील घटनेनंतर कलिंगडाबाबत भीतीचे वातावरण)
मुंबईतील पायधुनी प...
Continue reading
सोन्याच्या दरात मोठा बदल: 10 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल तर किती पैसे मोजावे लागतील? | संपूर्ण अपडेट
(Gold Rate Update: अमेरिका-इस्रायल संघर्षाचा जागतिक बाजारावर परिणाम)
जगभरात ...
Continue reading
ठाकरे गटात मोठी खळबळ: परभणी जिल्हा प्रमुखाची तडकाफडकी उचलबांगडी | पडद्यामागील राजकारण काय?
(शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात संघटनात्मक बदल, राजकीय हालचालींना वेग)
राज्याच्या र...
Continue reading
PPF खात्यात गुंतवणूक चुकली? दंड, नियम आणि खात्यावर होणारा परिणाम जाणून घ्या
भारतामध्ये दीर्घकालीन सुरक्षित बचतीसाठी लोकप्रिय असलेली योजना म्हणजे
Continue reading
लोहमार्ग पोलीस दलाचे कर्मचारी येथे नसल्यामुळे, प्रवास सुरक्षित नसल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे.
अकोला स्टेशनवर जशी दुर्दैवी घटना घडली, तशीच अकोटमध्ये घडल्यास कोणाला दाद मागायची? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अकोट स्थानकावरून सकाळी ९, दुपारी ३ आणि रात्री ८ वाजता अशा तीन मेमू ट्रेन सुटतात, मात्र रात्रीच्या वेळी
प्रवाशांना भीतीच्या सावटाखाली प्रवास करावा लागतो. रेल्वे प्रशासन अकोला सारखी
घटना अकोटमध्ये घडण्याची वाट बघत आहे का? असा सवाल आता प्रवाशांकडून विचारला जात आहे.
प्रवाशांच्या प्रतिक्रिया
➤ “मी नेहमी अकोट-अकोला ट्रेनने प्रवास करतो, पण आजपर्यंत एकही पोलीस कर्मचारी दिसले नाहीत.
रात्री ८ वाजता प्रवास करताना भीती वाटते, आम्ही प्रवासी असुरक्षित आहोत.”
– राम तायडे, प्रवासी, अकोट
➤ “अकोट रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानांची तैनाती करणे आवश्यक आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेता,
येथे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, बऱ्याचदा लाईट बंद असतात
आणि महिलांसाठी प्रसाधनगृहांचीही सोय नाही. रेल्वे प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष द्यावे.”
– विजय जितकर, रेल्वे संघर्ष समिती सदस्य, अकोट
रेल्वे प्रशासनाची उदासीनता धोकादायक
रेल्वे प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे त्वरित लक्ष देऊन अकोट स्थानकावर
आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांची त्वरित नियुक्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.