भगतसिंग चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणुकीची मागणी

भगतसिंग चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणुकीची मागणी

भगतसिंग चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी…घाणीवाला… मुर्तिजापूर..दि.२०

( तालुका प्रतिनिधी ) शहर संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते.शहरात विविध खाजगी व

शासकीय बॅंका,काॅंलेज, महाविद्यालय असुन शहराला जंक्शन रेल्वे स्टेशनचा दर्जा प्राप्त आहे.अशा शहरातील

Related News

एक महत्त्वाचा चौक म्हणजे भगतसिंग चौक असुन या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूकीची वर्दळ असते अशा या

महत्त्वाच्या चौकात वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणी माजी नगरसेवक तथा जिल्हा

नियोजन समिती सदस्य इब्राहिम कासम घानिवाला यांनी केली आहे.मुर्तिजापुर शहर हे दोन विभागात वसलेले आहे.

स्टेशन विभाग व जुनी वस्ती शहरातील नागरिकांना येण्या व जाण्यासाठी एकच प्रमुख मार्ग आहे.

जुनी वस्तीतील भगतसिंग चौक हा शहरातील एकमेव मुख्य चौक आहे.या चौकात नेहमी अत्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूकीची वर्दळ असते.

आणी वाहतूकीची कोंडी निर्माण होते.सदर चौकातुन दिल्ली.. हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.

दररोज मोठ्या संख्येने जडवाहनांची रेलचेल सुरू राहते.त्यातच याच चौकात दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो.

तसेच याच मेन रोडवरून विविध शाळा, खाजगी शाळेतील लहान लहान मुलं व मुली पायदळ ,सायकलने शाळेत जातात.

अशातच जड वाहनांची रेलचेल सुरू राहते.अशातच या भगतसिंग चौकात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

यापुर्वी याच चौकात एका डाॅकटरचा अपघाती मृत्यू झाला आहे.किरकोळ अपघात तर दररोजच होतात.

अशा वर्दळीचा या चौकात तात्काळ वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी एका

निवेदनाद्वारे जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांच्या कडे माजी नगरसेवक त

था जिल्हा नियोजन समिती सदस्य इब्राहिम कासम घानिवाला यांनी केली आहे.

Related News