यवतमाळ:* राज्यातील शांततापूर्ण वातावरण खराब करण्याचे काम काही मंत्रीच करत आहेत,
असा गंभीर आरोप माजी गृहराज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आज येथे केला.
विशेषतः नितेश राणे यांच्यासारख्या मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे.
Related News
संगारेड्डी, तेलंगणा | १७ एप्रिल २०२५ —
तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.
अमीनपूर परिसरात राहणाऱ्या रजिता नावाच्या एका ४५ वर्षीय...
Continue reading
पुणे | १७ एप्रिल २०२५ –
स्वारगेट बस स्थानकावर फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या तरुणीवरील बलात्कार
प्रकरणाचा समरी अहवाल आता समोर आला असून, त्यातून आरोपी दत्ता गाडे
याच्या विकृत...
Continue reading
इंझोरी | ता. १७ एप्रिल २०२५ –
जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि ओपन लिंक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या
आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमात इंझ...
Continue reading
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या बेस्टच्या एका बसला आज दुपारी अचानक
भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे ...
Continue reading
अकोला. गळंकी रोड गुलजारपूर वस्तीत अमरधाम स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत आली
असून ही स्मशानभूमी सद्यस्थितीत शेवटच्या घटका मोजत असल्याचा दिसत आहे.
अकोला शहरातील डाबकी...
Continue reading
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
भारतातील पहिल्या उच्चगती रेल्वे मार्गासाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
जपान सरकारकडून भारताला दोन शिंकान्सेन बुलेट ट्रेन स...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल २०२५ —
अकोल्यामध्ये केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने !
केंद्र सरकारने नॅशनल हेरॉल्ड संबंधित मालमत्ता जप्त करून
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार स...
Continue reading
मेरठ (उत्तर प्रदेश) | ता.
१६ एप्रिल २०२५ — उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे हद्दीतून एक
धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अजीम नावाच्या एका तरुणाने
आपल्या भावाक...
Continue reading
राजसमंद (राजस्थान) | ता.
१६ एप्रिल — राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील देलवाडा परिसरात आज एक भीषण अपघात झाला.
वरात घेऊन जाणारी एक खासगी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली.
...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल —
अकोल्यात पाणी प्रश्नाने उग्र रूप घेतलं असून शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे.
शहरात सुरु असलेल्या पाण्याच्या टंचाईविरोधात आज महापालिकेच्या जलप्रदाय विभा...
Continue reading
कोल्हापूर | ता. १७ एप्रिल —
"नाद करा पण कोल्हापूरकरांचं कुठं!" म्हणत कोल्हापूरकर फुटबॉलप्रेमींनी आपल्या
जल्लोषाचा अनोखा अंदाज दाखवला; मात्र यावेळी हा नाद थेट आयोजकांनाच महागात पड...
Continue reading
राजकोट | ता. १७ एप्रिल —
शहरातील इंदिरा सर्कलजवळ आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात शहर बसने अनेक
वाहनांना जोरदार धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेने संपू...
Continue reading
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून संबंधितांना समज द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
यवतमाळ दौऱ्यावर असताना देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नागपूरमधील दोन गटातील वादावर भाष्य करताना ते म्हणाले की, या वादासाठी मंत्र्यांची चिथावणीखोर वक्तव्ये जबाबदार आहेत.
नागपूर शहरात नेहमीच शांततापूर्ण वातावरण असते, जिथे सर्व जाती-धर्माचे लोक एकोप्याने राहतात.
मात्र, काही मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण दूषित होत आहे.
बजरंग दलाने औरंगजेबाची कबर काढण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे राज्यातील वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
यावर बोलताना देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील वातावरण कलुषित होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना योग्य समज देणे आवश्यक आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवर अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
प्रशांत कोरटकर याचे नागपूरमधील कोणत्या नेत्यांशी संबंध आहेत, हे सर्वांना माहित आहे.
अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आणि त्यानंतर तो फरार झाला,
ही आश्चर्यकारक बाब आहे, असे देशमुख म्हणाले.
बीड जिल्ह्यात गुंडांना संरक्षण दिले जात आहे. गेल्या साडेतीन ते चार महिन्यांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाली. जर शासनाचे प्रतिनिधीच गुंडांना संरक्षण देत असतील, तर अशा घटना वाढणारच.
राज्यात मुली, तरुणी आणि महिला सुरक्षित नाहीत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, दिवसाढवळ्या हत्या होत आहेत.
राज्यातील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेऐवजी गुंडांना संरक्षण दिले जात आहे, असा आरोप देशमुख यांनी केला.
*कायदा व सुव्यवस्था धोक्यात*
राज्यातील वाढलेल्या गुन्हेगारी परिस्थितीवर राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती तातडीने कशी सुधारेल, यासाठी राज्य शासन आणि
गृहमंत्र्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही अनिल देशमुख म्हणाले.