Chhattisgarh Naxals Encounter: गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून ऑपरेशन सुरु झाले. त्यात नक्षलवादी आणि
सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरुर झाली. या चकमकीत 22 नक्षलवादी ठार झाले. त्यांचे मृतदेह
आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
Related News
-शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर
अमरावती, दि. 10 : गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मुलभूत अधिकार आहे.
त्यानुषंगाने शासनाकडून निपूण महाराष्ट्र अभ...
Continue reading
अकोला (गंगानगर बायपास):
गत १० वर्षांपासून भक्तीमय उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या सालासर बालाजी मंदिरात
यंदा हनुमान जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक १२ एप्रिल...
Continue reading
तेल्हारा (९ एप्रिल २०२५):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ...
Continue reading
अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची "मुंबई-अमरावती-मुंबई" विमानसेवा आता सुरू झाली आहे.
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्...
Continue reading
अकोट (दि. ९ एप्रिल २०२५):
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था, अकोट याच्या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडीत तसलीम ताहेर पटेल
यांची चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या का...
Continue reading
बार्शीटाकळी, जि. अकोला (प्रतिनिधी):
आसरा माता यात्रा,अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील एक प्रसिद्ध धार्मिक उत्सव...या यात्रेदरम्यान,
अनेक भक्त आणि भाविक ...
Continue reading
सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावाती...
Continue reading
अकोला, दि. १० (प्रतिनिधी):
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ एप्रिल रोजी
रात्री एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आ...
Continue reading
मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे ...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि माजी आमदार रामाभाऊ कराळे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना
पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हि...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न शिवनी येथून अकोल्याकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाचे
अचानक नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.
डॉ....
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
अकोट तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांबाबत तक्रारीनंतर चौकशी झाली
आणि ग्रामपंचायत सचिवासह इतर चार व्यक्तींवर उपविभागीय अधिकारी अकोट यांनी द...
Continue reading
Chhattisgarh Naxals Encounter: नक्षलींचा गड असलेल्या छत्तीसगडमधील बीजापूर आणि
दंतेवाडात सुरक्षा दलाने मोठे ऑपरेशन सुरु केले आहे. सुरक्षा दलांनी नक्षलींची कंबर तोडली आहे.
दोन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये 22 नक्षली ठार झाले आहेत. या कारवाईत एक जवान शहीद झाला आहे.
सुरक्षा दलास घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा मिळाला आहे.
40 ते 45 नक्षलवाद्यांना जवानांनी घेरले होते. गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाने नक्षलीविरोधात मोठे मोहीम सुरु केली.
सुरक्षा दलाच्या टीमने विजापूर आणि दंतेवाडाच्या गंगालूर भागात ऑपरेशन सुरु केले.
यावेळी नक्षली आणि सुरक्षा दलात चकमक सुरु झाली. दोन ऑपरेशनमध्ये 22 नक्षली ठार झाले आहे.
सुरक्षा दलाने विजापूरमध्ये 18 तर कांकेरमध्ये 4 नक्षलींना ठार केले. या चकमकीत एक जवान शहीद झाला.
महिन्याभरात दुसऱ्यांदा मोठे ऑपरेशन
गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून ऑपरेशन सुरु झाले. त्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरुर झाली.
या चकमकीत 22 नक्षलवादी ठार झाले. त्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
या चकमकीत विजापूर डीआरजीचा एक जवानही शहीद झाला आहे. गेल्या महिन्यात विजापूर परिसरातही ऑपरेशन राबवण्यात आले होते.
विजापूरच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात ही कारवाई करण्यात आली होती.
त्यावेळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 31 नक्षलवादी मारले गेले होते.
त्यानंतर ही दुसरी मोठी कारवाई आहे.
चकमकीच्या ठिकाणाहून एके ४७, एसएलआर सारख्या मोठ्या ऑटोमॅटिक रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
नक्षलवादी कमांडर पापा राव या भागात सक्रिय आहेत. नक्षलवाद्यांची पश्चिम बस्तर विभागीय समिती सक्रिय होती.
मात्र, या परिसराला नक्षलवाद्यांचे विद्यापीठ म्हटले जाते.
कांकेर-नारायणपूर सीमा भागात नक्षलवादी असल्याची माहिती मिळताच संयुक्त पोलीस दलाने शोध सुरु केला.
या मोहिमेसाठी सुरक्षादले रवाना केली. कांकेर-नारायणपूर सीमा भागात डीआरजी, बीएसएफच्या टीमसोबत नक्षलवाद्यांची चकमक सुरू आहे.