विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज चांगलाच गदारोळ झालेला बघायला मिळाला.
दिशा सालियान प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केल्याने विरोधक देखील आक्रमक झालेले दिसले.
याच मुद्द्यावरून विधान परिषदेच्या कामकाजात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे चांगलेच संतापलेले दिसले.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
मंत्री गिरीश महाजन यांच्याशी अंबादास दानवेंची खडाजंगी झाल्याने 15 निटांसाठी विधानपरिषदेचं कामकाज तहकूब करावं लागलं.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये आज जोरदार बाचाबाची झाली.
अंबादास दानवे सभागृहात बोलताना म्हणाले की, ”सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नाहीत?
मग त्यांच्या वेळेनुसार कामकाज चालणार आहे का? सभापती महोदय सभागृहाच्या कामकाजाचा क्रम
असतानाही तुम्ही एकाचवेळी चार-चार जणांना बोलण्याची परवानगी देता? तुम्हाला (दिशा सालियन मृत्यू प्रकरण)
चौकशी करायची तर करा. एसआयटी नेमलेली आहे. काही अडचण नाही. मात्र, एका व्यक्तीच्या विरोधात चार-चार जणांनी बोलायचं का?
असा प्रश्न दानवे यांनी केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन मध्येच बोलले, त्यानंतर दानवेंचा पारा चढला. मी तुमच्याशी बोलत नाही, मला बोलूद्या.
सभापती महोदय मंत्र्यांचा हस्तक्षेप थांबवायला हवा. नाहीतर मी जातो, त्यानाच बोलूद्या म्हणत दानवे संतापले.
ही हमरी-तुमरी एवढी वाढली की अंबादास दानवे आणि गिरीश महाजन हे एकमेकांच्या अंगावर धावून जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली.
मात्र, तेव्हाढ्यात विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सभागृहाचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केलं.