RSS On Nagpur Violence: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार प्रमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही,” असे सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले आहे.
प्रविण मुधोळकर, नागपूर: नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाच्या एका वक्तव्याने नवी चर्चा सुरू झाली आहे. “समाजासाठी कोणताही प्रकारचा हिंसाचार चांगला नाही.Related News
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कु...
Continue reading
पंतप्रधान बालेन शाहांचा मोठा यू-टर्न! भारताच्या राजदूतांची भेट; चीनला धक्का देणारा 1 मोठा संकेत?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताबा...
Continue reading
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत; 17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी पेटलंरांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आं...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
Paper Leak: 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटी दंड; एकनाथ शिंदेंचा पेपर लीक करणाऱ्यांना कडक इशारा
मुंबई : परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्य...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
जंतर-मंतरपासून रांचीपर्यंत चर्चेत आलेल्या नेहा बोरा आहेत तरी कोण? शिक्षण, PhD आणि विद्यार्थी राजकारणाचा प्रवास
झारखंडमध्ये JPSC-JSSC परीक्षेच्या मु...
Continue reading
Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, चिखलफेक आणि चप्पल-बूट भिरकावले; बंगालमध्ये खळबळ
पश्चिम बंगालच्या
Continue reading
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले आहे.
आरएसएसच्या या स्पष्टीकरणाने सरकारला तसेच विश्व हिंदू परिषदेचे कान टोचल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरजवळ खुलताबाद येथे 380 वर्षांपासून औरंगजेबाची कबर आहे.
राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या नियमांतून ती बाहेर काढून उखडून टाकावी.
अन्यथा,विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते स्वतः ती उखडून अरबी समुद्रात फेकून देतील..
असा इशारा विश्व हिंदू परिषदने सोमवारी दिला होता. त्यानंतर नागपूरमध्ये मोठा हिंसाचार उफाळला.
विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर औरंगजेबाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
त्यावर काही मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता. मात्र, त्यानंतर हे प्रकरण शांत झाले.
मात्र, त्याच दिवशी संध्याकाळी महाल परिसरात जाळपोळ झाली आणि संपूर्ण प्रकरणाला हिंसक वळण लागले.
देशभरात यावर चर्चा सुरू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार प्रमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही,” असे सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने औरंगजेबाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर विश्व हिंदू परिषदेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
हिंदू समाज कधीच हिंसेचे समर्थन करत नाही आणि हिंसा करतही नाही. हिंदूंना हिंसक ठरवण्याचा कोणाचाही प्रयत्न चुकीचा आहे.
नागपुरातील दंगल ठरवून आणि नियोजनपूर्वक घडवून आणली गेली आहे. त्यामुळे या दंगलीचे कोणीही समर्थन करू शकत नाही,
असे विश्व हिंदू परिषदचे महाराष्ट्र क्षेत्र संघटन मंत्री गोविंद शेंडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राज्यभर आंदोलन झाले. दरम्यान, नागपुरात दंगल घडल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
या पार्श्वभूमीवर, ‘औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही,’
असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट केल्यामुळे या वादाला आणखी पेट मिळाला आहे.