Pune News : पुण्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या शिवाजीनगर परिसराचे नाव
‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ असे करण्यात यावे, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
Pune News : राज्यात अनेक शहरांची, ठिकाणांनी नावे बदलण्यात आली आहे. यात आणखी एका ठिकाणाची भर पडली आहे.
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
पुण्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या शिवाजीनगर परिसराचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’
असे करण्यात यावे, अशी विनंती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासनाला केली आहे.
पुणे शहरातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज नगर नाव देण्यात यावे.
या मागणीसाठी 24 जून 2024 रोजी शिवप्रेमी संघटनांच्या वतीने पदयात्रा आणि मोर्चे काढण्यात आले होते.
त्यावेळी मेट्रो अधिकाऱ्यांनी नामांतराच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र,
अद्याप त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. असा औचित्याचा मुद्दा
सभागृहात विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी मांडला. यावेळी पीठासीन अधिकारी असलेल्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी,
” शिवाजीनगर हा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात असून, सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.
येथे अनेक लोकप्रतिनिधी आणि मान्यवर राहतात. या परिसराला छत्रपती
शिवाजी महाराज नगर असे नाव देण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.
त्यामुळे शिवाजीनगर परिसराचे नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर असे करण्यात यावे”,
अशी शासनाला विनंती केली.