मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बाळा नांदगावकर
यांनी आणलेल्या महाकुंभच्या गंगाजलवर टीका करत गंगा नदीच्या स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केला.
त्यानंतर त्यांच्यावर धार्मिक भावना दुखवल्याची टीका होत आहे.
Related News
चूकूनही करू नका ही एक चूक
‘याचना नाही आता रण होईल’
विराट कोहलीचा टेस्ट क्रिकेटमधून संन्यास
चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत – ७२ तासांत ५ महिलांचा मृत्यू
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता…
नीट ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं अकोल्यातील अशोक वाटिकेत प्रार्थनांचं आयोजन
बुद्ध पौर्णिमा निमित्त महाबोधी वृक्षाचे १२ तास महापूजा
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून सुरू
विराट कोहलीची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती;
ड्रोन हल्ल्यांमुळे PSL स्थगित; बांगलादेशी खेळाडूचा पाकिस्तान क्रिकेटवर गंभीर आरोप
भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या फायटर जेटला नुकसान
मात्र असं असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आज राज ठाकरे यांचं कौतुक केलेलं बघायला मिळालं.
आज माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मिमीक्री करत असं बोलायला हिम्मत लागते,
राज ठाकरेंनी हिम्मत दाखवली, अशा शब्दात त्यांचं कौतुक केलं आहे.
मात्र आम्ही असं बोललो असतो तर आत्तापर्यंत यांच्या घरावर दगड आले असते,
आमच्या विरोधात निषेध मोर्चे निघाले असते, आम्ही देशद्रोही सुद्धा ठरलो असतो, असंही आव्हाडांनी म्हंटलं आहे.
भारतात प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. मी राज ठाकरे यांचं अभिनंदन
करेल की असा हिमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. आपल्या मनातलं बोलायला हिम्मत लागते.
आम्ही बोलायला घाबरतो की आपल्या मागे लागतील हे, पण राज ठाकरे बिनधास्त बोलले आहेत,
असं म्हणत त्याच्या डेरिंगला सलाम आहे, असं म्हणत आव्हाडांनी ठाकरेंना सलाम ठोकला.
Read more news here : https://ajinkyabharat.com/aajchaya-earth-sankalpat-shetkari-debt-forwards-announcement-rohit-pawar/