God Exists : अखेर देवाचा शोध लागला! हॉर्वर्ड विद्यापीठातील खगोल, भौतिक शास्त्रज्ञ आणि
एअरोस्पेस इंजिनिअर डॉ. विली सून यांनी हा दावा केला आहे.
त्यासाठी त्यांनी एक गणितीय फॉर्म्युला पण सांगितला आहे. त्यामुळे जगात एकच चर्चा सुरू झाली आहे.
Related News
देव आहे की नाही, याविषयी जगात दोन प्रमुख विचारधारा आहेत.
एक आस्तिक वर्ग, जो म्हणतो जगाचे पान सुद्धा देवाच्या मर्जीशिवाय हालत नाही.
तर दुसरा वर्ग जो देवाचे अस्तित्वतच मानत नाही. तो म्हणतो हे सर्व झूठ आहे.
देव ही मानव निर्मित संकल्पना, विचार आहे. हा वाद हजारो शतकांपासून सुरू आहे.
आहे रे आणि नाही रे यांच्यातील हे अंतर एका संशोधनामुळे कमी होण्याची दाट शक्यता आहे.
हॉर्वर्ड विद्यापीठातील खगोल, भौतिक शास्त्रज्ञ आणि एअरोस्पेस इंजिनिअर डॉ. विली सून यांनी देवाचे अस्तित्व आहे ,
असा दावा केला आहे. देवाचे अस्तित्व मांडण्यासाठी त्यांनी एक गणिती सूत्र सुद्धा सुज्ञ पणे मांडले आहे.
त्यांच्या यानवीन थेअरीमुळे विज्ञान क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कारण अंतराळ, ब्रह्मांडाविषयी सखोल ज्ञान असणारे स्टीफन हॉकिन्स यांनी देवाचे अस्तित्व नाकारले होते.
त्यांच्या दाव्यावर अजून पूर्ण वाद संपलेला नसतानाच आता डॉ. सून यांच्या नवीन दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
फाईन ट्युनिंग आर्ग्युमेंट
त्यांनी त्यांच्या देव अस्तित्वात आहे याला बळकटी देणाऱ्या सिद्धांताला ‘फाईन ट्यूनिंग आर्ग्युमेंट ‘ असे नाव दिले.
या सिद्धांतातील दाव्यानुसार, ब्रह्मांडाचे जे भौतिक नियम आहेत. ते इतके अचूक आहेत की,
त्यांना आपण योगायोग बिलकूल म्हणजे बिलकूल, अजिबात मानू शकत नाही.
ते जीवनाच्या पोषणाला बळ देतात. जीवन फुलवण्यासाठी मदत करतात.
गणिताच्या माध्यमातून त्यांनी या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यांनी वैज्ञानिक परिभाषेत देवाचे अस्तित्व सिद्ध करण्याचा, देव आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची जगभरात चर्चा होत आहे.
पॉल डिरॉक यांचा वारसा डॉ. सून यांनी पुढे चालवला
तर देवाचे अस्तित्व आहे, एक परवालौकिक तत्व, परमशक्ती या जगाचे संतुलन ठेवते, अशी मान्यता आहे.
याविषयीचे गणितीय सूत्र सर्वात अगोदर केम्ब्रिज विद्यापीठातील गणिताचे प्राध्यापक, संशोधक पॉल डिरॉक यांनी मांडले होते.
डिरॉक यांच्या सूज्ञानुसार, जगातील स्थिरांक हे आश्चर्यकारक पद्धतीने, अचूकतेने जुळतात.
जगाच्या भौतिक नियमांचे संतुलन गणितीय सिद्धांताद्वारे समजून येते.पॉल डिराक यांनी याविषयीचा दावा त्यांच्या पुस्तकात केला आहे.
गणितामधील सूत्रांच्या मदतीनेच या विश्वाची निर्मिती करण्यात आली आहे, असा पॉल यांचा ठाम समज होता.
दावा होता. डॉ. सून यांनी त्यांचाच वारसा पुढे चालवला आहे. एका पॉडकॉस्टमध्ये त्यांनी डिरॉक यांच्या सिद्धांताचा आधार घेतला आहे.
त्यांच्या मते गणित आणि ब्रह्मांड यांच्यामध्ये एक सुसंवाद आहे. त्यातूनच त्यांनी देवाच्या अस्तित्वाविषयी मोठा दावा केला आहे.