राज्यपालांच्या अभिभाषणात शेतकरी व महिलांसाठी मोठा अपडेट!”

राज्यपालांच्या अभिभाषणात शेतकरी व महिलांसाठी मोठा अपडेट!"

सौर ऊर्जा मार्फत शेतकऱ्यांना पंप पुरवले जाणार आहेत
सर्व शेतीचे फीडर सौर वर परावर्तित करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे

२ लाखांहून अधिक घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आपण उभारली आहे
१२ लाखांहून अधिक घरे ग्रामीण भागात उभारण्याचे नियोजन आहे

अटल भूजल योजना सरकार राबविण्यात येत आहे
त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल
१ लाख ३१ हजार हेक्टर हून अधिक जमीनीला यामुळे फायदा होईल

९५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेतून मदत केली जात आहे

Related News

५५ हजार कोटींहून अधिक निधी बँकेच्या माध्यमातून वितरित केले जात आहेत

इथेनॉलचा पर्यायी वापर वाढवला जात आहे

एमएसपी अतंर्गत सोयाबीनची रेकॉर्ड ब्रेक खरेदी सरकारने केली आहे

१ तालुका १ मार्केट कमिटी स्कीम राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे

३२५ महिला बचत गटांना सरकारने ड्रोन पुरवले आहेत
नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणाचा हा प्रयत्न आहे

१८ हजार अंगणवाडी सेविकांची भरती करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे
तसेच लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज कळावे म्हणून प्रत्येक अंगणवाडीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे

इंजिनियर व मेडिकल परीक्षांसाठी अनुसूचित जातींमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे

शिष्यवृत्तीच्या माध्यमातून १ हजार २०० कॉलेज व ४ हजार हून अधिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे

महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोग्राम राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यासाठी नवी मुंबई येथे डाटा सेंटर उभारण्यात येत आहे
तसेच सायबर क्राइम ला आळा घालण्याच२ प्रयत्न या माध्यमातून केला जाईल

सातारा, सिंधुदुर्ग व नाशिक येथे ३ नर्सिंग कॉलेज उभारण्यात येतील

नाशिक हे हब म्हणून उभे होते आहे

रक्तदान, कँसर, थायरॉईड अशा सात विविध आरोग्य बाबींवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे

मिशन लक्षवेध योजना सरकारने सुरू केले आहे
या योजनेत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंना तयार करण्याचा मानस आहे
त्यात आर्चरी, टेबल टेनिस, व विविध खेळांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण देण्यात येत आहे

केंद्राने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे
त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे अभिनंदन करतो

Related News