सेंट पॉल्स अकॅडमी येथे मराठी राजभाषा गौरव दिवस उत्साहात साजरा

सेंट पॉल्स अकॅडमी येथे मराठी राजभाषा गौरव दिवस उत्साहात साजरा

अकोट

श्री.जी. कॉलनी स्थित सेंट पॉल्स अकॅडमी येथे आज दि.27/02/2025 रोजी मराठी राजभाषा गौरव दिवस

उत्साहात साजरा करण्यात आला.प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ

कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचे मोलाचे योगदान तर होतेच

Related News

पण मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा

गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कऱण्यात आली.

त्यानंतर डॉ.अर्चना रायबोले व योगेश चेडे व त्यांच्या संच यांनी स्वागत गीत सादर केले.

पाहुण्यांच्या स्वागतानंतर अनिता सोनोने यांनी प्रास्ताविक सादर केले.तसेच स्वरूपा रेखाते,

अन्वेषा राजगुरू,ईश्वरी बुटे,के.जी.टू ते वर्ग 2 च्या विद्यार्थिनींनी व

सारिका रेळे,शीला काळे,अर्चना गावंडे यांनी आपले मत व्यक्त केले.

मनीषा कुलकर्णी यांनी लाभले.आम्हास बोलतो मराठी,डॉ.अर्चना रायबोले यांनी मंगल देशा पवित्र देशा तर अनन्या

घनबहादूर हिने ही मायभूमी ही जन्मभूमी तसेच के.जी.टू ते वर्ग 2 री च्या विद्यार्थिनींनी गीत सादर केले.

मराठी विषयाला शिकवणाऱ्या शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक विजय बिहाडे यांनी आपल्या भाषणांमधून मराठी भाषेचे महत्त्व याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटिया,उपाध्यक्ष लूनकरन डागा,संस्था सचिव प्रमोद चांडक,

शाळेचे मुख्याध्यापक विजय बिहाडे उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी,रिंकू अग्रवाल,पर्यवेक्षक अभिजीत मेंढे,

सारिका रेळे,प्रभुदास नाथे तसेच मराठी विषय शिक्षककांची मंच्यावर उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे आयोजन वनिता थोरात,अनिता सोनोने,मनीषा कुलकर्णी यांनी केले.सूत्रसंचालन सेजल रंदे,गौरी बेराड,पल्लवी ढगे,

यांनी तर आभार प्रदर्शन ईश्वरी हरणे,कांचन नहाटे यांनी केले.मालती महल्ले,पूजा गावंडे,यामिनी पाटील,

महानंदा कोरडे,मयुरी हुतके,मेघा काळपांडे,दीप्ती अग्रवाल,रोहिणी कोकाटे,

अभिलाष निचड,रवि अंबोरे,संदेश चोंडेकर,तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले.

Read more news here :https://ajinkyabharat.com/shri-shivaji-vidyalaya-national-science-day-sajra/

 

Related News