अकोल्यातील बेघर निवारा केंद्रात मोठा घोळ आमदार अमोल मिटकरींचं स्टिंग ऑपरेशन

अचानक भेटीत उघड झाल्या गंभीर त्रुटी - आमदार मिटकरींनी व्यवस्थापनाला धारेवर धरले

अकोल्यातील बेघर निवारा केंद्रात मोठा घोळ आमदार अमोल मिटकरींचं स्टिंग ऑपरेशन

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात स्टिंग ऑपरेशन केलेय..

अकोल्यातल्या माता नगरात नव्याने स्थापन झालेल्या संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रात आमदार अमोल मिटकरींनी आकस्मिक भेट दिलीय.

Related News

रात्री उशिरा अमोल मिटकरी थेट बेघर निवारा केंद्रावर दुचाकीने पोहोचले.. आणि या बेघर निवारण केंद्रात मोठा घोळ असल्याचा त्यांच्या पाहणीत दिसून आलाय..

बेघर निवारा केंद्रातल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना येथे मूलभूत सुविधा नसल्याचं मिटकरींच्या पाहणीतून समोर आलंय.

अनेकांना वेळेवर औषधांचा पुरवठा होत नाहीये, जेवण्याची पाहिजे तशी व्यवस्था येथे नाहीये..

महिन्याकाठी इथल्या नागरिकांना मिळणाऱ्या 2 हजार रुपयांचं मानधन देखील त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही,

अशा तक्रारी इथल्या नागरिकांनी आमदार मिटकरींसमोर मांडल्या. इतकंच नव्हे तर या बेघर निवारा केंद्रात दररोज जेवण देखील उपलब्ध होत नाही..

बाहेरून अन्नदान करणाऱ्या लोकांकडून इथे जेवणाचा पुरवठा होत आहे, मात्र शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा इथल्या नागरिकांना मिळत नाहीये, असा थेट आरोप मिटकरींनी केलाय…

 

अधिक बातम्या करीता भेट द्या :    https://ajinkyabharat.com/9137-2/

Related News