नवी दिल्ली – लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे.
अपेक्षित असलेला ८वा वेतन आयोग (8th Pay Commission)
आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
जानेवारी २०२५ मध्ये केंद्र सरकारने आयोगाची घोषणा केली होती.
मात्र अद्याप त्यावर कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत.
आयोग लांबणीवर का?
अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती प्रलंबित
Terms of Reference अजून निश्चित नाही
आर्थिक तरतूद स्पष्ट नाही
कामकाजाची रूपरेषा अधांतरी
या सर्व कारणांमुळे आयोगाची प्रक्रिया ठप्प झालेली आहे.
सरकारसमोर आर्थिक ताण
७व्या वेतन आयोगामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर हजारो कोटींचा भार आला होता.
८वा आयोग लागू करण्यासाठी पुन्हा प्रचंड निधीची तरतूद आवश्यक आहे.
मात्र सध्या तरी बजेटमध्ये अशी तरतूद झालेली नाही.
आणखी दोन ते तीन वर्षांचा विलंब
मागील अनुभव पाहता, ७वा वेतन आयोग लागू होण्यासाठी
तीन वर्षांचा कालावधी लागला होता.
त्यामुळे ८वा वेतन आयोग २०२८ पर्यंत लागू होऊ शकतो,
अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कर्मचाऱ्यांच्या घसघशीत पगारवाढीच्या स्वप्नाला त्यामुळे मोठा धक्का बसला आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/jhotchi-goli-deon-patila-slum/