मुंबई- हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची जोडी बॉलिवूडच्या पडद्यावरसुद्धा आणि खऱ्या आयुष्यात सुद्धा लोकप्रिय आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा गुरुवारी ४४वा लग्नाचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने हेमा यांनी त्यांचे काही फोटो शेअर केले असून ‘अवर ऍनिव्हर्सरी फोटो’ असं कॅप्शन त्या फोटोला दिलंय. हे फोटो याहून दोघांनी पुन्हा लग्न केलं की काय? असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केलाय.
पुन्हा लग्न?
हेमा यांनी तीन फोटो शेअर केले असून एका फोटोमध्ये दोघांनी वरमाला घातल्याचं दिसतंय. दुसऱ्या फोटोत धर्मेंद्र, हेमा यांना किस करताना दिसतायत तर तिसऱ्या फोटोत त्यांची मुलगी ईशा देओल सुद्धा दिसतेय. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
दोघांची लव्ह स्टोरी
हेमा आणि धर्मेंद्र यांची लव्ह स्टोरी खूप गाजली. के. ए. अब्बास यांच्या चित्रपटाच्या प्रिमिअरदरम्यान दोघांची ओळख भेट झाली. चित्रपटाच्या प्रिमिअरदरम्यान हेमा यांना रंगमंचावर बोलावण्यात आलं तेव्हा धर्मेंद्र यांनी पहिल्यांदा हेमा मालिनी यांना पाहिलं आणि ते त्यांच्या प्रेमात पडले.
Related News
देशविरोधी बोललं तर बाय-बाय!” – पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय
दादरमधील नाबर गुरुजी विद्यालयाच्या बंदतेने मराठी शाळांचे भविष्य अधांतरी
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी:
‘मला चटके देताना एवढंच म्हणायचे…’, गरम सळईचे चटके दिलेल्या तरूणानं सांगितली धक्कादायक आपबीती
मुलीच्या छेडछाडीप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक आरोपी, सध्या शिंदे गटात!”
शिंदे सरकारच्या योजनेनं गोची; ‘लाडक्या भावां’मुळे भलतीच अडचण; कॅबिनेटमध्ये वादळी चर्चा
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीची तिरडी; पुण्यात रणरागिणींचं अनोखं आंदोलन!
मोठी बातमी! मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ब्लॉक; CSMT वरुन सुटणाऱ्या ५९ लोकल, ‘या’ मेल-एक्स्प्रेस रद्द, पाहा वेळापत्रक
मी शहाबाज बोलतोय, मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देऊ, पाकिस्तानी नंबरवरुन धमकी, पोलिस अलर्ट
मातोश्रीवर धूमधडाक्यात प्रवेश, शिवसेनेला नडले, सहाच महिन्यात ठाकरेंना धक्का, बड्या नेत्याची भाजपात घरवापसी
गणपत गायकवाड यांच्या मुलाचं नाव चार्जशीटमधून वगळलं, ठोस पुरावे नाहीत, पोलिसांचं स्पष्टीकरण
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान, म्हणाले, आमच्या सरकारने ज्या बाबी…
रिपोर्टनुसार, ‘प्रतिज्ञा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हेमा, धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या. मात्र, धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं त्यामुळे हेमा यांच्या वडिलांनी विरोध केला. परंतु, कुटुंबियांच्या विरोधात जाऊन १९८० मध्ये हेमा यांनी धर्मेंद यांच्यासोबत लग्न केलं.
दरम्यान, धर्मेंद्र अजूनही अभिनयक्षेत्रात कार्यरत असून करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांच्या ”तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात सुद्धा धर्मेंद्र यांनी काम केलंय.
हेमा मालिनी यांच्याबद्दल सांगायचं तर त्या सध्या राजकारणात सक्रीय असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील मथुरा येथील भाजपाच्या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे.