राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणने दखल घेत स्वत:हून खटला केला सुरू
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय
आणि केरळ वन विभागाला 8 वर्षांत 845 हत्तींच्या मृत्यूची नोटीस बजावली आहे.
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
द हिंदू या वृत्त संस्थेने केरळमध्ये आठ वर्षांत 845 हत्तींच्या मृत्यूची
नोंद झाल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीच्या आधारे न्यायालयाने
या प्रकरणात स्वतःहून खटला दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार,
2015 ते 2023 काळात, केरळच्या जंगलात 845 हत्तींच्या मृत्यूची नोंद झाली आहे,
यात विशेषत: 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या हत्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक दर्शवले आहे.
न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव, न्यायिक सदस्य न्यायमूर्ती अरुण कुमार त्यागी
आणि तज्ञ सदस्य डॉ. ए. सेंथिल वेल यांच्या खंडपीठासमोर
खटला सुरू करण्यात आला आहे. खटला पर्यावरणीय नियमांचे पालन करण्याशी
संबंधित आहे, विशेषत: 1986 च्या पर्यावरण संरक्षण कायदा आणि
जैविक विविधता कायद्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
यातील 40% तरुण हत्ती एंडोथेलियोट्रॉपिक हर्पेसव्हायरस-हेमोरेजिक डिसीजमुळे
बळी पडलेत. हत्तींच्या मृत्यूंची तपासणी करण्यासाठी तमिळनाडूच्या
एलिफंट डेथ ऑडिट फ्रेमवर्क सारखा प्रोटोकॉल स्वीकारण्याची शिफारस
करण्यात आली आहे. केरळचे मुख्य वनसंरक्षक आणि मुख्य वन्यजीव वॉर्डन
यांना एमओईएफ आणि सीसी यांनी नोटीस बजावली आहे.
चेन्नई येथील न्यायाधिकरणाच्या दक्षिण विभागीय खंडपीठातर्फे
३० सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
Read also: