मनोज जरांगे यांच्याकडे 800 इच्छुक उमेदवारांचे अर्ज

मनोज जरांगे

मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय

पक्का केलेला दिसत आहे. त्यांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवायला

सुरुवात केली आहे. अनेकांनी भेटून त्यांच्याशी चर्चाही केली आहे.

Related News

त्यात माजी आमदार, विद्यमान आमदार आणि इतर मातब्बर नेत्यांचा

समावेश आहे. अनेक बड्या पक्षातील लोकही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून

लढण्यास तयार आहेत. मनोज जरांगे यांच्याकडे आतापर्यंत 800 इच्छुकांनी

अर्ज दिले आहेत. या सर्वांना आमदार व्हायचं आहे. मनोज जरांगे पाटील

यांनीच हा आकडा आज जाहीर केला आहे. या आकड्यावरून

मनोज जरांगे यांची लोकप्रियता किती आहे हे दिसून येत आहे.

मनोज जरांगे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिलीय.

आमच्याकडे इच्छुकांचा मोठा डेटा आहे. सुमारे 700 ते 800 जणांनी अर्ज केले

आहेत. या सर्व अर्जांची छाननी होईल. तज्ज्ञांची समिती हे काम करेल.

पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज आले आहेत. तर मराठवाडा, विदर्भातूनही

चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण कोकण आणि मुंबई विभागातून कमी अर्ज

आले आहेत. अर्ज येतच आहेत. त्यामुळे इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याची तारीख

वाढवायची की नाही हे ठरवायचे आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

Read also: https://ajinkyabharat.com/ranancha-kirana-distribution-started-early-due-to-fear-of-code-of-conduct/

Related News