बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संघर्ष प्रतिष्ठानच्या उपक्रमांतर्गत 80 तरुणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. हा उपक्रम एक दिवसापासून सुरु होता आणि स्थानिक समाजसेवक जनार्धन खिल्लारे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला.
कार्यक्रमात जनार्धन खिल्लारे यांनी सांगितले की, “रक्ताचा थोडासा भासल्यासही आमची संस्था मोफत उपलब्ध करून देईल. गोरगरिबांच्या हक्कासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.”
या रक्तदान शिबिराचे आयोजन जनार्धन खिल्लारे, गणेश कुटे, विवेक वाळके, हरीश तांबेकर, शुभम गालात, लक्ष्मण वाकोडे, चेतन कोल्हे, मयूर चांभारे, दर्शन ठोंबरे, गिरधर राठोड, भूषण राठोड, जीवन जाधव, अक्षय चंद्रकर, प्रवीण तेजवान, विशाल गुडदे यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख भेटी म्हणून राजेश धाबेकर, मनोहर राठोड, सोनू वाटमारे, करण पलान, शाहू योगेश टापरे, प्रल्हाद गालाड, जुगल किशोर जामनिक, अतिश राठोड, आशिष धाबेकर, सतीश राठोड, कुलदीप चव्हाण, शुभम नाईक, गौतम तपासे, महेश घनगाव, मयुर काळे, ञिशरन हातोले तसेच विदृपेश्र्वर मित्र मंडळ आणि शूरवीर सेवालाल महाराज मित्र मंडळ व समस्त गोरसेना अकोला जिल्हा यांनी उपस्थिती दाखवली.
सदर रक्तदानातून गोळा केलेले रक्त साई जीवन ब्लड बँकला देण्यात आले.
read also :https://ajinkyabharat.com/bachchan-kutumbachan-satya-samor/
