६५ तासांनंतर महान धरणातून जलविसर्ग बंद, पाणी साठा ८८.०८%

६५ तासांचा थरार संपला महान धरणाचे दरवाजे बंद

अकोला : १६ ऑगस्टच्या रात्री धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात तसेच मालेगाव आणि वाशीम परिसरात झालेल्या

अतिवृष्टीमुळे मध्यरात्री महान धरणाचा पाणीपातळी वाढली  आणि मध्यरात्र १२ वाजता धरणाचे दोन दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले.

१७ आणि १८ ऑगस्टला धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने १८ ऑगस्टच्या दुपारी महान धरणाचे सर्व दहा

दरवाजे ६० सेंटीमीटर म्हणजेच दोन फूट उघडण्यात आले आणि नदीपात्रात पाणी विसर्ग करण्यात आला.

१९ ऑगस्ट रोजी पाणीपातळी घसरू लागल्याने तब्बल ६५ तासांनंतर सायंकाळी ५ वाजता सर्व दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले.

त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग संपूर्णपणे थांबविण्यात आला आहे.

आज पाऊस न झाल्याने जलसाठा हळूहळू वाढत आहे. दरवाजे बंद करताना आणि विसर्गाच्या वेळेस महान धरणात

उपलब्ध जलसाठा ३४७.१० मीटर, ७६.०६२ दशलक्ष घनमीटर इतका म्हणजेच ८८.०८ टक्के होता.

स्रोतांनी अकोला बातमीपत्राला सांगितले की, पुढे पाऊस झाल्यास अधिक किंवा कमी पाणी सोडण्याचा निर्णय वेळेनुसार घेतला जाईल.

कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे, उपविभागीय अधिकारी आदित्य कासार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता संदीप नेमाडे

आणि ड्युटीवर नियुक्त कर्मचारी मनोज पाठक हे धरणातील वाढत्या जलसाठ्यावर सतत लक्ष ठेवून आहेत.

Read also : https://ajinkyabharat.com/seven-janmanchaya-gathiyevji-millions-of-ganda-beedamadhye-faswegiricha-tharar/