काटेपुर्णा तलावात 70 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला 

काटेपुर्णा

बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत काटेपुर्णा तलावात ११ सप्टेंबर रोजी दुपारी एका 70 वर्षीय अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.सदर मृतदेह चंडिका देवी मंदिराजवळील तलाव पात्रात पाण्यात तरंगताना गुराखी यांच्या दृष्टीस आला. घटनास्थळी पोलीस दल आणि विर भगतसिंग आपत्कालीन पथकाचे सदस्य पोहोचून मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली.घटनास्थळी मृतदेहाच्या ओळखीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी घटनास्थळाचे पंचनामा करून मृतदेह अकोला येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.पोलीसांनी आवाहन केले आहे की, सदर अनोळखी महिला कुणी ओळखत असल्यास किंवा नातेवाईक असल्यास बोरगाव मंजू पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा. पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/beed-news-both-munde-atmosphere-contaminated-the-environment/