नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. हौज काझी परिसरात राहणाऱ्या 65 वर्षीय महिलेवर तिच्या 39
वर्षीय मुलाने दोनवेळा अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पीडित आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून,
या घटनेमुळे दिल्ली हादरली आहे.
वडिलांना घटस्फोटासाठी दबाव
तक्रारीनुसार, पीडित महिला आपल्या सेवानिवृत्त पती, आरोपी मुलगा आणि 25 वर्षीय मुलीसह राहत होती. सौदी अरब दौर्यावरून परतल्यानंतर मुलाने आईवर अत्याचार केला.
याआधी त्याने वडिलांना फोन करून पत्नीला घटस्फोट द्यावा, कारण आईचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत दबाव आणला होता.
जबरदस्ती, मारहाण आणि बंदिस्त
1 ऑगस्ट रोजी सौदी दौर्यावरून परतल्यानंतर मुलाने आईवर पहिल्यांदा अत्याचार केला. “त्याने माझा बुरखा उतरवला, मला खोलीत बंद करून मारहाण केली”, असं आईने तक्रारीत
सांगितलं आहे. घाबरलेल्या आईने थेट आपल्या मोठ्या मुलीकडे धाव घेतली होती.
दुसऱ्यांदा अमानुष कृत्य
11 ऑगस्ट रोजी पुन्हा आपल्या घरी परतल्यावर आरोपी मुलाने रात्री 9.30 वाजता आईला खासगीत बोलावलं आणि जबरदस्ती केली. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी पहाटे 3.30 वाजता पुन्हा
आईवर अत्याचार केला. “मी तुला जुन्या अनैतिक संबंधाची शिक्षा देतोय”, असं आरोपी मुलगा म्हणाल्याचंही तक्रारीत नमूद आहे.
मुलीने दिली धीर, पोलिसांत तक्रार
या घटनेची माहिती पीडित आईने आपल्या धाकट्या मुलीला दिली. तिने आईला धीर देऊन थेट पोलिस ठाण्यात घेऊन गेली आणि तक्रार दाखल केली.
पोलिसांनी बलात्कार आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून आरोपी मुलाला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/putin-yancha-modis-phone-trumpsocatchaya-chachacha-dila-aadhawa/