बातमी:पीएम किसान योजनेत अलीकडे करण्यात आलेल्या बदलामुळे राज्यातील ६० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. यामागील कारण, केंद्र सरकारने एक नवीन निकष लागू केला आहे. त्यानुसार पती आणि पत्नीच्या नावावर शेती असल्यास, आता केवळ पत्नीलाच योजनेचा लाभ मिळेल, पती लाभार्थी ठरणार नाही.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या मते, कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देण्याचा निर्णय पूर्णतः चुकीचा असून, त्यामुळे अनेक गरीब शेतकऱ्यांना नुकसान होत आहे.
रोहित पवार म्हणतात, “कुटुंबात नवरा आणि बायको दोघांच्या नावावर शेती असल्यास, आता फक्त महिला लाभार्थ्यालाच पीएम किसान योजनेचा लाभ मिळेल. पुरुष लाभार्थ्याला मिळणार नाही, हा निर्णय योग्य नाही.”
ते पुढे म्हणतात की, “जीएसटीमध्ये कपात करून काही दिवसात हप्ते थांबवले जात आहेत. आधीच पीएम किसानचे पैसे मिळाले नाहीत तर राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका बसतो. केंद्र सरकारने या निर्णयावर पुनर्विचार करावा.”
बदलामुळे प्रभावित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २० वा हप्ता जमा झालेला नाही. शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून या निर्णयाचा पुनर्विचार आवश्यक असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/social-media-molestation-government-decisions/