51 वर्षांची मलायका अरोराच्या लूकनं नाही तर पोटावर सगळ्यांच्या नजरा; जाणून घ्या का?

51 वर्षांची मलायका अरोराच्या लूकनं नाही तर पोटावर सगळ्यांच्या नजरा; जाणून घ्या का?

Malaika Arora : मलायका अरोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सगळीकडे तिचीच चर्चा आहे.

Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच चर्चेत असते. कधी मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते

तर कधी काही वेगळंच कारण. आज मलायका अरोरा ही 51 वर्षांची असली तरी तरुणींना लाजवेल असं तिचं सौंदर्य आहे. मलायका ही तिच्या

Related News

सुंदरतेला टिकवून ठेवण्यासाठी हेल्दी डायट आणि लाइफस्टाईल फॉलो करते. नुकतीच मलायका एका ठिकाणी स्पॉट झाली.

त्यावेळी सगळ्यांचे लक्ष हे तिच्याकडे लागलं होतं. असं असलं तरी अनेकांचं लक्ष हे तिच्या पोटाकडे गेलं.

मलायका अरोरा सध्या अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ-एमएक्स प्लेयरवर स्ट्रीम होत आहे. यावर असलेला डान्स

रिअॅलिटी ‘हिप हॉप 2’ ला ती परिक्षक म्हणून काम करत आहे. याच्याच शूटच्या जवळपास ठिकाणी ती आणि रेमो डिसूजाला पापाराझींनी स्पॉट केलं.

या दरम्यान, मलायकानं फॉर्मल आउटफिट कॅरी केला होता. पण यावेळी सगळ्यांचं लक्ष हे तिच्या स्ट्रेच मार्क्सवर गेलं आहे.

काही तिला ट्रोल करत आहेत तर काही ती ज्या प्रकारे ते स्ट्रेचमार्क्स कॅरी करते त्याविषयी बोलताना दिसत आहेत.

मलायका अरोराचा एक व्हिडीओ पाहून लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं की, ‘एक आई होणं गर्वाची गोष्ट आहे.

‘ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तिचं वय किती आहे, हे तिच्या चेहऱ्यावरून कळत नाही. पोटाकडे पाहिलं की दिसतं.’

तिसरा नेटकरी म्हणाला, ‘त्यामुळेच आमचं मलायकावर प्रेम आहे.’ एकानं लिहिलं ‘मदर इंडिया.’

मलायका अरोरानं एकदा ‘पिंकव्हिला’ शी बोलताना स्ट्रेच मार्क्सविषयी सांगितलं की म्हातारं होणं हा आयुष्याचा एक भाग आहे आणि तिला ते कळतं.

तिनं हे देखील सांगितलं की जर लोकं तिला तिच्या स्ट्रेच मार्क्सवरून ट्रोल करतात तर करू द्या.

कारण त्यामुळे तिला काही फरक पडत नाही. तर तिचे जे पांढरे केस आहेत त्याचा सुद्धा तिला आनंद आहे.

मलायका अरोराला एक मुलगा असून त्याचं नाव अरहान खान आहे. अरहान हा 22-23 वर्षांचा आहे.

Related News