दहशतवाद्यांचाही समावेश, भारत अलर्ट मोडवर
सध्या हिंसाचारानं बांगलादेश धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे.
आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशात आंदोलन सुरू होतं.
Related News
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’
एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!
मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळालं.
त्यानंतर बांगलादेशात मोठा हिंसाचार उफाळून आला.
त्यानंतर तब्बल 15 वर्षांपासून बांगलादेशची धुरा सांभाळणाऱ्या
शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला
आणि देश सोडून पलायन केलं. हिंसक आंदोलकांनी थे
ट शेख हसीना यांचं शासकीय निवास्थान लुटलं.
सध्या बांगलादेशातील घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हिंसाचार शिगेला पोहोचला आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या हाती गेली.
मात्र, आंदोलकांनी देशाची सूत्र लष्कराकडे देण्यास विरोध दर्शवला आहे.
हिंसक जमावानं कारागृह देखील सोडलं नाही.
तुरुंगात घुसूनही जमावानं जाळपोळ केली.
या काळात सुमारे 500 कैदी पळून गेले. या कैद्यांमध्ये
अनेक दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.
अशा परिस्थितीत भारतीय लष्करही अलर्ट मोडवर आहे.
आज भारत सरकारच्या वतीनं संसदेत बांगलादेश हिंसाचारावर निवेदन देण्यात आलं.
Read also: https://ajinkyabharat.com/shiv-sena-mla-cji-chidley-at-ineligibility-hearing/