50 रुपयांची कमाई सांगून ट्रोलिंगला सामोरं जाणं

कंगना रानौत पूरग्रस्तांसमोरच रडगाणं

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील पूरग्रस्तांची भेट देण्यासाठी पोहोचलेल्या बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रानौत यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये कंगना म्हणताना दिसल्या की, “माझ्या रेस्टॉरंटने काल फक्त 50 रुपयांचा व्यवसाय केला, पगार व देखभाल खर्च 15 लाख रुपये आहेत.

मी सिंगल वुमन आहे, माझे प्रॉब्लेमही समजा.” यावेळी तिने पत्रकाराला सुनावून, “माझ्यावर हल्ला करू नका, फक्त प्रश्न विचारा,” असेही सांगितले.

पूरग्रस्तांची भेट देताना कंगना स्वतःची परिस्थिती व्यक्त करताना दिसल्या आणि केंद्र व राज्य सरकारच्या निधीबाबतही माहिती दिली.

मात्र त्यांच्या विधानामुळे सोशल मीडियावर नेटीजन्सनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी ट्रोल करत, “असे नेते तर जनतेला मारतील,”

अशी टीका केली, तर काहींनी तिला भविष्यातील निवडणुकीसाठीही टिपणी केली.

read also :https://ajinkyabharat.com/dheel-24-tasant-bananar-nave-record/