बार्शीटाकळी प्रतिनिधी
राज्यातील ७०० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या बंजारा लभाना तांड्यांना महसुली व
स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी मुंबईतील मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय जाहीर केला.
राज्यात सुमारे ३९०० बंजारा तांडे असून, त्यापैकी अनेक तांड्यांना अजूनही महसुली गावाचा दर्जा मिळालेला नाही.
मंत्री गोरे यांनी अमरावती, संभाजीनगर आणि नाशिक विभागीय
आयुक्तांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या बैठकीत महंत जितेंद्र महाराज, श्रावण चव्हाण व इतर समाजबांधव उपस्थित होते.
तांड्यांच्या विकासासाठी दिलेल्या १३९ कोटी निधीचा आढावा घेणार असल्याची माहितीही देण्यात आली.
तसेच, प्रत्येक तांड्यावर सभागृह व स्मशानभूमी उभारण्याचे नियोजन आहे.
या बैठकीत ‘लमाण’ ऐवजी ‘लभाना’ हा शब्द वापरणे, ओळखपत्र देणे आणि समितीच्या
सदस्यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.
विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यातील मोरझिरा या तांड्याला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा देण्यासाठी
तात्काळ आदेश देण्यात आले, यामुळे संपूर्ण बंजारा समाजात आनंदाची लाट उसळली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/ganjachi-smuggling-doghe-attate/