८० वर्षांच्या आजोबांनी केले देहदान

वैद्यकीय शिक्षणासाठी अनमोल योगदान

बातमी:अकोट – समाजात आदर्श निर्माण करणारी एक प्रेरणादायक घटना अकोट तालुक्यातील सावरा येथून समोर आली आहे. वय ८० वर्षे असलेले भाऊराव नथुजी आंग्रे यांनी मरणोत्तर देहदान करण्याचा उदात्त निर्णय घेतला आहे. भाऊराव आंग्रे यांचे देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथील शरीर रचना शास्त्र विभागाला दान करण्यात आले आहे.

भाऊराव आंग्रे यांनी मरणोत्तर आपला देह वैद्यकीय शिक्षणासाठी उपयोग व्हावा, अशी सदिच्छा व्यक्त करत हे निस्वार्थ योगदान केले आहे. त्यांचा हा निर्णय सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची जाणीव दाखवणारा आदर्श ठरला आहे. त्यांच्या या उदात्त निर्णयामुळे अनेक डॉक्टर, विद्यार्थी आणि वैद्यकीय शिक्षणक्षेत्र लाभ घेणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला तर्फे भाऊराव नथुजी आंग्रे यांना देहदान प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले असून, नोंदणी क्रमांक 31/25 आणि जावक क्रमांक 197/25 नोंदविण्यात आला आहे.

भाऊराव आंग्रे यांचा हा निर्णय समाजात मोठ्या प्रमाणात कौतुकास पात्र ठरला असून, अन्य नागरिकांसाठीही एक प्रेरणास्त्रोत बनला आहे. त्यांच्या या उदात्त कृत्यामुळे अनेक जिवांना भविष्यातील उपचार व संशोधनात मदत होणार आहे.

read also :https://ajinkyabharat.com/jilahadhiyachayanchaya-adesh/