ठाणे –कळव्यातील कलाप्रेमींना आता मोठा आनंद मिळणार आहे. कळव्यातील बहुप्रतिक्षित नाट्यगृह अखेर ४० कोटी रुपयांच्या निधीसह उभारणीसाठी हिरवा कंदील मिळाला आहे. राज्य शासनाने या प्रकल्पासाठी जीआर जारी केले असून, बांधकामाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
जागा: १२,७०० चौरस मीटर
आकार: तळ + दोन मजले
आसन क्षमता: ४५०–५०० पेक्षा अधिक
सुविधा: सुसज्ज उपहारगृह
पार्किंग: १७५ चारचाकी व ८५ दुचाकी वाहने
या नाट्यगृहामुळे कळव्यातील स्थानिक कलाकारांना सांस्कृतिक व्यासपीठ मिळणार आहे. नाट्यप्रयोग, संगीत मैफिली आणि कला प्रदर्शनांसह विविध कार्यक्रम येथे आयोजित करता येतील. हे नाट्यगृह सुरू झाल्यानंतर कळवा परिसर सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाईल, आणि ठाण्यातील बाळगंधर्व व गडकरी रंगायतनानंतर तिसरे नाट्यगृह ठरेल.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रकल्पाला गती मिळाली. तत्कालीन आयुक्त आर. ए. राजू यांच्या कार्यकाळात नाट्यगृह उभारणीचा निर्णय झाला होता, मात्र निधीअभावी काम थांबले होते. आता निधी मिळाल्याने बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.
read also :https://ajinkyabharat.com/donald-trump-yana-jerk/
