Mumbai Metro 3: 37 किमी लांब, 27 स्टेशन – मुंबईची पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो सेवा सुरू होणार
मुंबई – मुंबईकरांसाठी मोठा आनंद! दशहर्याच्या शुभ मुहूर्तावर, 30 सप्टेंबर 2025 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो-3 (Aqua Line) चा अंतिम टप्पा उद्घाटन होणार आहे. ही 37 किमी लांब आणि एकूण 27 स्टेशन्सची मार्गिका मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत मेट्रो सेवा ठरणार आहे.
आधीच सुरू असलेला आरे ते वरळीचा 22.5 किमी टप्पा आणि आता आचार्य अत्रे चौक ते कफ परेड (11 किमी) टप्पा सुरू होईल.
यामुळे आरे JVLR ते कफ परेडचा प्रवास केवळ 1 तासात पूर्ण होणार, जेथे रस्त्याने 2 तासांहून अधिक वेळ लागत होता.
महत्वाचे फायदे:
दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरांच्या सोप्या संपर्कामुळे प्रवासात क्रांतिकारी बदल
घरगुती आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांपर्यंत सुलभ पोहोच
धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक व पर्यटन संस्था सोयीस्कर अंतरावर
कुलाबा, वरळी, दादर, बीकेसी, सांताक्रूझ, सीएसएमटीसारखे महत्त्वाचे केंद्रे जोडणारी रूटलाइन
वाहतुकीची घालमेल कमी होणार, प्रदूषणात घट
प्रमुख स्टेशनची यादी:
आरे JVLR → सीप्झ → अंधेरी MIDC → मरोळ नाका → CSMIA टी2 → सहारा रोड → CSMIA टी1 → सांताक्रूझ → वांद्रे कॉलनी → बीकेसी → धारावी → शीतलादेवी मंदिर → दादर मेट्रो → सिद्धिविनायक मंदिर → वरळी → आचार्य अत्रे चौक → विज्ञान संग्रहालय → महालक्ष्मी → मुंबई सेंट्रल → ग्रॅंट रोड → गिरगांव → कालबादेवी → सीएसएमटी → हुतात्मा चौक → चर्चगेट → विधान भवन → कफ परेड
हे पाऊल मुंबईच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेत एक नवा इतिहास घडवणार आहे.
read also : https://ajinkyabharat.com/dindicate-yaditil-dubar-naava-mhanje-nivandukisathi-dhoka/
