100 हून अधिक गंभीर आजारी..
तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने
Related News
34 जणांचा मृत्यू झाला आहे.
तर 100 हून अधिक लोक गंभीर आजारी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
राज्याची सीबी सीआयडी या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी लोकांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले
आणि सदर घटना थांबवण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे,
असे स्टालिन यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे,
“भेसळयुक्त दारू पिऊन लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समजल्यानंतर,
मला धक्का बसला आणि दुःख झाले.
या प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली आहे.
अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांची माहिती जनतेने दिल्यास
तत्काळ कारवाई केली जाईल.
समाजाला बरबाद करणारे असे गुन्ह्या संदर्भात कठोरपणे कारवाई केली जाईल.
तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की,
“कल्लाकुरीची येथे विषारी दारू पिऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले
हे जाणून मला खूप दुःख झाले.
इतर अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
शोकाकुल कुटुंबियांप्रती माझे मनःपूर्वक संवेदना आहे
आणि रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.”
Read also: https://ajinkyabharat.com/todays-day-13-hours-13-minutes/