३०० वर्षांची परंपरा

नवरात्रोत्सवात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

अकोट  –विदर्भातील अकोट शहरातील खाईनदीच्या तीरावर वसलेले आदिशक्ती कालंका माता मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून याला सुमारे ३०० वर्षांची परंपरा लाभली आहे. आतापर्यंत घरात असलेले हे मंदिर आता जीर्णोद्धारानंतर नव्या रुपात भक्तांसाठी खुले झाले आहे.

कालंका माता मंदिर पंचक्रोशीतील अनेक भाविकांचे कुलदैवत मानले जाते. मंदिराच्या आख्यायिकेनुसार, देवीची मूर्ती स्वयंभू असल्याचे मानले जाते. १९५९ मध्ये खाईनदीला आलेल्या प्रचंड पुराच्या वेळी नदीचे पाणी मंदिरात शिरले असता, देवीच्या स्पर्शानंतर नदीचा पूर ओसरू लागला, अशी श्रद्धा आजही भक्तांमध्ये सांगितली जाते.

नवरात्रोत्सव काळात आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून ते विजया दशमीपर्यंत मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण करण्यात आला असून, भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री कालंका देवी संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

read also :https://ajinkyabharat.com/harinamprami-sunil-sheke-yanche-died/