जिल्हापरिषद शाळेचे 30 हजार विद्यार्थी अद्याप गणवेशापासून वंचित

शाळा

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये

शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो.

Related News

2024-25 या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ

शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. त्यासाठी सर्व शाळांमध्ये स्थानिक

महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एकसमान एक रंगाचे

दोन गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

एकसमान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरुन उपलब्ध करुन देण्याबाबत

आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आज या सूचना देऊन तीन महिन्यांहून

अधिक कालावधी लोटला असून एकट्या नागपूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी

शालेय गणवेशापासून वंचित असल्याचे चित्र आहे.

परिणामी, उद्या 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनी या विद्यर्थ्यांना जुन्याच गणवेशात

झेंडावंदन करण्याची नामुष्की ओढवली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/captain-martyred-who-fought-against-terrorist-with-bullet/

Related News