३ ऑगस्ट रोजी शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे चिखलीत अधिवेशन….!

३ ऑगस्ट रोजी शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे चिखलीत अधिवेशन....!

चिखली/प्रतिनिधी

सिटू संलग्न लाल बावटा शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे २ रे जिल्हा अधिवेशन रविवार

दिनांक 3 ऑगस्ट रोजी चिखली येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनामध्ये मानधन वाढ,

अतिरिक्त कामाची सक्ती, शालेय व्यवस्थापन समिती कडून वेळोवेळी कामा वरून कमी करण्याची देण्यात येत

असलेली वारंवार धमकी या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी विचार विनिमय व चर्चा करण्यात येणार आहे.

चिखली येथील मौनी बाबा मठाच्या सभागृहात आयोजित या अधिवेशनाचे अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड पंजाबराव गायकवाड राहणार असून.

या त्रेवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन बहुजन शिक्षक आघाडीचे अध्यक्ष तथा गावंडे महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश गावंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थजी खरात हे

उपस्थित राहून अधिवेशनाला शुभेच्छा देणार आहेत.

तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

या अधिवेशनाला जिल्ह्यातील मध्यांन भोजन योजनेतील शालेय पोषण आहार कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे

आवाहन कोषाध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे, सचिव शोभा काळे, समाधान राठोड ,अनिल राठोड, सविता राजपूत, राजेश गायकवाड,

राजू गिरी ज्योती आराख, उषा डुकरे, मालता खरात, रेखा जाधव, नंदा इवरकर, सुधाकर डुकरे, गजानन शेळके,

बाबुराव जावळे, बेबीताई मोरे, गोदावरी वाघमारे इत्यादींनी केले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/punda-yehethe-sahityaratna-lokshaheer-annabhau-yanchi-jayanti-mothaya-sasari/