२५ दिवस बेपत्ता राहिलेल्या गुरुचरण सिंगचा पहिला फोटो आला समोर, पोलिसांबरोबर दिसतोय अभिनेता
गुरुचरण सिंग घरी परतल्यावरचा पहिला फोटो (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
Related News
Shambhuraj Desai : ज्या पद्धतीने मागच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे त्यांनाच गृहमंत्रीपद होतं,
तोच फॉर्म्युला आता लागू असायला हवा. असा सल्ला शिवसेनेचे आमदार शंभूराज...
Continue reading
टेस्ला चीफ इलॉन मस्क ने संयुक्त राष्ट्र में ईरान के डिप्लोमैट आमिर सईद इरावानी से सोमवार को किसी गुप्त जगह पर मुलाकात की
। न्यूयॉर्क टाइम्स के मुताबिक दोनों ने ईरान और अमेरिका के ...
Continue reading
Sushant Singh Rajput Unfulfilled Desire: प्रतिक बब्बरनं अलीकडेच एका मुलाखतीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल सांगितलं. प्रतिकनं सांगितलं की, 'छिछोरे'च्या शुटिंगनंतर सुशांतला...
Continue reading
Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection: 'भूल भुलैया 3'ची जादू बॉक्स ऑफिसवर आहे.
या चित्रपटानं थिएटरमध्ये रिलीज होऊन दोन आठवडे पूर्ण केले असून या काळात चांगली कमाईही केली आहे.
Bh...
Continue reading
Shraddha Kapoor As Naagin : अभिनेत्री श्रद्धा कपूरला एका बिग बजेट चित्रपटाची ऑफर मिळाल्याची माहिती समोर येत आहे.
Shraddha Kapoor Upcoming Film : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्ध...
Continue reading
मणेरा यांचे विकासाच्या मुद्याकडे लक्ष केंद्रीत; विद्यमान आमदारांना रोखण्याचे ठाकरे गटापुढे मोठं आव्हान आहे.
भाईंदर/विजय काते : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचार...
Continue reading
मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील अंडरग्राऊंड मेट्रोला आग लागली आहे.
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये ही आग लागली आहे.
सध्या ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
...
Continue reading
मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्ला
Manoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मर...
Continue reading
या मतदारसंघात सदा सरवणकर, अमित ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे.
मात्र आज माहीममध्ये प्रचारासाठी गेलेल्या सदा सरवणकरांवर कोळी महिलेने संताप व्यक्त केला.
महाराष्ट्रात...
Continue reading
indian railways new app: भारतीय रेल्वेने नियमित कोट्यवधी लोक
प्रवास करतात. आता भारतीय रेल्वे एक अॅप लॉन्च करत आहे.
या अॅपमध्ये तिकीट बुकींग, ट्रेन ट्रॅकींग, प्लॅटफॉर्म तिकीट
,...
Continue reading
शेवटपर्यंत दफनभूमीपर्यंत बॉयफ्रेंडचा साथ देण्याचा शब्द. दुसऱ्या धर्मात लग्न करणार ही अभिनेत्री. TV च स्टार कपल जैस्मिन भसीन आणि अली गोनी लवकरच लग्न करणार आहेत. त्यांनी स्वत: कबुली ...
Continue reading
अर्जुन कपूरने नुकताच एका आजाराबद्दल खुलासा केला आहे.
गेल्या वर्षी तो डिप्रेशनमध्ये गेल्याचेही सांगितले. यानंतर त्याला थेरपीचीही मदत घ्यावी लागली.
अर्जुन कपूरने 'सिंघम अगेन'मध्ये ...
Continue reading
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग २५ दिवसांपासून बेपत्ता होता.
तो अखेर स्वतःच घरी परतला आहे. २२ एप्रिलपासून गुरुचरण बेपत्ता होता
आणि दिल्ली पोलीस त्याचा राजधानीसह जवळच्या राज्यांमध्ये शोध घेत होते.
दिल्ली पोलिसांनी मुंबईत येऊनही त्याचा शोध घेतला होता.
आता २५ दिवसांनी परतलेल्या गुरुचरण सिंगला पहिला फोटो समोर आला आहे.
गुरुचरण सिंग शुक्रवारी (१७ मे रोजी) दिल्लीतील पालम भागात घरी आला.
गुरुचरण घरी आला, त्याबद्दल पोलिसांना कळवण्यात आलं. मग पोलिसांनी त्याची चौकशी केली.
चौकशीत तो नेमका कुठे गेला होता, याबाबत त्याने सांगितलं. घरदार सोडून गुरुचरण सिंग
धार्मिक प्रवासावर गेला होता, असं त्याने स्वतः चौकशीदरम्यान
पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं.
जवळपास २५ दिवसांत गुरुचरण सिंग अमृतसर आणि लुधियाना सारख्या अनेक शहरांतील गुरुद्वारांमध्ये थांबला होता,
पण नंतर आपण घरी जायला पाहिजे याची त्याला जाणीव झाली आणि तो घरी परतला,
असं त्याने पोलिसांनी सांगितलं. आता घरी परतलेल्या गुरुचरणचा पोलिसांबरोबरचा
एक फोटो व्हायरल होत आहे.
यात ५० वर्षीय गुरुचरणचे केस पांढरे
धार्मिक यात्रा करायला गेलेला गुरुचरण सिंग सुखरुप घरी परतल्याने त्याच्या
कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. अभिनेता अविवाहित
असून त्याचे आई-वडील खूप वृद्ध आहेत. त्यामुळे गुरुचरण अचानक बेपत्ता झाल्याने त्यांना
धक्का बसला होता. पोलीसही त्याचा शोध घेत होते. त्यांनी गुरुचरणला
शोधण्यासाठी दिल्लीसह उत्तराखंड व हरियाणा तसेच मुंबईला
भेट दिली होती.
दरम्यान २२ एप्रिलला मुंबईला जात असल्याचं सांगून गुरुचरण सिंग घराबाहेर पडला
. पण तो दिल्ली विमानतळावर पोहोचलाच नाही. त्याने मुंबईला येत असल्याचं मित्रांना
सांगितलं होतं, मात्र तो विमानात बसलाच नाही हे कळाल्यावर त्यांनी शोधाशोध सुरू केली
. चार दिवस कुटुंबीय व मित्रांनी शोध घेऊनही तो सापडला नाही मग त्याच्या वडिलांनी पोलिसांत
तक्रार दिली. २६ एप्रिलला हरगीत सिंग यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे त्याचा शोध सुरू
करण्यात आला होता. पोलिसांना अभिनेत्याचा अपहरण झाल्याचा संशय होता. तसेच त्याने त्याच्या दोन
फोनपैकी एक घरात ठेवला तर दुसरा पालम भागात सापडला होता. त्याने त्याच्या बँक खात्यातून
१४ हजार रुपये काढले होते. त्याची बँक खाती तपासल्यावर त्याच्यावर कर्ज असल्याचं आढळलं होतं.
Read Also
https://ajinkyabharat.com/shikhar-since-i-was-15-16-years-old-know-what-janhvi-kapoor-said-about-her-boyfriend/