अकोला: दहिहंडा येथे दहा दिवसाआड पाणीपुरवठा

तीन दिवसांआड पाणीपुरवठा करावाः ग्रामस्थांची मागणी

अकोला तालुक्यातील दहीहंडा हे गाव मोठे असून जिल्ह्याच्या

शेवटच्या टोकाचे गाव आहे. या गावाची लोकसंख्या अंदाजे १२

Related News

हजाराच्या जवळपास आहे. या गावाला ८४ खेडी योजना अंतर्गत

वारी प्रकल्पातून जीवन प्राधिकरण योजना अंतर्गत पाणीपुरवठा

केल्या जातो. दहीहंडा या गावाला जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत

योजनेशिवाय दुसरे पर्याय नाही. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी दहा

दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहे.

तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.

दहीहंडा हे खारपान पट्टा भागात येत असल्यामुळे गोड पाण्याचे

दुसरे स्रोत नाही. गाववासीयांना योजनेवरच अवलंबून राहावे लागत

आहे. उन्हाळ्यामध्ये गाव वासियांना प्रत्येक भागाला पंधरा

दिवसाआड प्रमाणे पाणीपुरवठा केला जात होता. त्याचप्रमाणे

वस्तुस्थिती पाहून ग्रामस्थ पाणी साठवणूक करीत होते. परंतु आता

पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध

आहे. तसेच पाणी बदलल्यामुळे नवीन पाण्यामध्ये तिसऱ्या किंवा

चौथ्या दिवशी चामडोक, जंतू निर्माण होत आहेत. त्यामुळे

पाणीपुरवठा साठवणूक करता येत नाही. साठवलेले पाणी

ग्रामस्थांनी पिण्यासाठी वापर केला तर विविध आजार होण्याची

भीती आहे. जिल्ह्यात विविध प्रकारच्या आजाराचा फैलाव होत

असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. म्हणून जास्त दिवस

साठावणुक केलेले पाणी वापरण्यापासून ग्रामस्थांना भीती निर्माण

झालेली आहे. यंदाच्या पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्याने

धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे मात्र वारी प्रकल्पाद्वारे

जीवन प्राधिकरण मार्फत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दहीहंडा या

गावाला सद्यस्थितीत पूरेसा पाणी पुरवठा केल्या जात नसल्यामुळे

गावात प्रत्येक भागाला दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.

काही महिन्यापासून जलवाहिनीची गती कमी झाल्यामुळे

जलकुंभ भरण्यासाठी सहा तास पेक्षा जास्त लागत आहे. तसेच

योजने द्वारे पाणीपुरवठा कमी होत असल्यामुळे गावात प्रत्येक

भागाला दहा दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/safety-of-high-water-tanks-in-akola-depends-on-rams-trust/

Related News