राज्याचे वातावरण सध्या बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन
तापले आहे. केवळ चार वर्षांच्या चिमुकलीवर शिपाई
अक्षय शिंदे याने केलेल्या अत्याचारामुळे संपूर्ण राज्य
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
हादरुन गेलं आहे. राज्यसह देशभरातून यावर रोष व्यक्त
केला जात आहे. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नाही,
कायद्याचा धाक नाही आणि पोलीसांवर देखील गृहमंत्र्यांचा
वचक नाही अशा टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून
केल्या जात आहे. विरोधकांनी या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना
घेरले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे.
या प्रकरणावरुन काँग्रेसने मंत्रालयाबाहेर देखील आंदोलन छेडले.
तसेच येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ची हाक काँग्रेसकडून
देण्यात आली आहे. काँग्रेस नेत्यांनी बदलापूर प्रकरणावरुन राज्य
सरकारला घेरले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी
राज्य सरकारवर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा
गंभीर आरोप केला आहे. नाना पटोले म्हणाले आहेत की,
बदलापूरमध्ये झालेल्या प्रकारामुळे समाजमन हेलावून गेलं आहे.
खऱ्या अर्थाने आज आपल्या महाराष्ट्रामध्ये लहान मुली देखील सुरक्षित नाही.
ही घटना महाराष्ट्रालाच काळीमा फासणारी आहे. किंबहुना हे प्रकरण
दाबण्यासाठी सरकारनेच प्रयत्न केले असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात येत आहे.
प्रकरणातील शिक्षण संस्था भाजप आणि संघाशी निगडित असल्याने भाजप
आणि संघाची बदनामी होऊ नये म्हणून अशा पद्धतीची काळजी त्या ठिकाणी घेत आहे.
परिणामी, त्याचा उद्रेक समाजामधून झाल्याचे काल बघायला मिळाले.
सत्ता आणि सत्तेची गर्मी त्यातून त्याची गुरमी या ठिकाणी बघायला मिळाली.
बदलापूर अत्याराच्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची
नेमणूक करण्यात आली, या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी
आक्षेप घेत सरकारवर टीका केली आहे. ती शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे.
त्याच पक्षाच्या सबंधित वकिलाला विशेष वकील म्हणून नेमणूक केली, ज्याने लोकसभेची
निवडणूक लढवली आहे. उद्या हे प्रकरण दाबले गेले, तर त्याला जबाबदार कोण?
असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/bjp-announces-9-candidates-for-state-assembly/