महेंद्रसिंग धोनीचं आयपीएल 2025मधील सफर संपलं आहे.
यंदाचा हंगाम केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर चेन्नई सुपर किंग्ससाठीही सर्वात खराब हंगामांपैकी एक ठरला.
मात्र, शेवटच्या सामन्यात चेन्नईने टॉप टीम गुजरात टायटन्सला 83 धावांनी हरवत विजयी निरोप घेतला.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
या सामन्यानंतर धोनीनं दिलेलं एक विधान सोशल मीडियावर चांगलंच गाजत आहे,
जे अनेकांनी विराट कोहलीशी जोडलं आहे.
धोनीचं सूचक विधान:
सामना संपल्यानंतर सादरीकरण समारंभात हर्षा भोगले यांनी धोनीला नेहमीप्रमाणे प्रश्न विचारले.
निवृत्त होणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला.
धोनीनं सांगितलं की, तो काही महिने वेळ घेईल आणि शरीराची स्थिती पाहून पुढचा निर्णय घेईल.
मात्र यावेळी धोनी म्हणाला:
“हे प्रोफेशनल क्रिकेट आहे. केवळ परफॉर्मन्सच्या आधारावर निवृत्ती घ्यायची ठरवली,
तर काही खेळाडूंना 22व्या वर्षीच निवृत्त व्हावं लागेल. महत्त्वाचं हे असतं की तुमच्यात अजूनही.
‘भूक’ आहे का? शरीर फिट आहे का? आणि टीमला तुमची गरज आहे का?”
विराट कोहलीवर अप्रत्यक्ष टोला?
धोनीचं हे वक्तव्य विराट कोहलीच्या अलीकडील टेस्ट क्रिकेटमधील निवृत्तीच्या
पार्श्वभूमीवर चर्चेचं कारण ठरत आहे. भारताचे प्रमुख निवडकर्ते अजीत अगरकर यांनी नुकतंच सांगितलं की,
विराटने स्वतःच्या अपेक्षांप्रमाणे परफॉर्म न केल्यामुळे टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
पण धोनीच्या मते, फॉर्म नव्हे तर ‘फिटनेस आणि इच्छाशक्ती’ महत्त्वाची असते.
विराट सध्या पूर्णपणे फिट आहे, आणि आयपीएलमध्ये त्याची ‘रन भूक’ अजूनही स्पष्टपणे दिसून येते.
याशिवाय, इंग्लंड दौऱ्यात टेस्ट संघाला त्याची मोठी गरज होती. तरीही विराटने अचानक टेस्ट क्रिकेटला रामराम ठोकला.
धोनीच्या या विधानामुळे क्रिकेटप्रेमी आणि तज्ज्ञांमध्ये चर्चा रंगली आहे –
की विराट कोहलीला अजून क्रिकेट द्यायचं होतं का?
आणि धोनीच्या या शब्दांनी त्याने पुन्हा विचार करावा का?
Read Also : https://ajinkyabharat.com/the-vermilion-which-will-erase-the-tyachan-mitanam-aahe/